Dharmendra-Ahana Deol : अहाना देओलला धर्मेंद्र यांच्या मालमत्तेतून काय काय हवे? स्वतः केला खुलासा

Ahana Deol : धर्मेंद्र यांची मुलगी अहाना देओलला वारसाहक्काने कोणती गोष्ट हवी, जाणून घेऊयात. तिने एका मुलाखतीत यासंबंधित खुलासा केला होता.
Ahana Deol
Dharmendra-Ahana Deolsaam tv
Published On
Summary

वयाच्या 89 वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत.

अहाना देओलला वारसाहक्काने वडीलांची एक खास गोष्ट हवी आहे.

धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनानंतर देओल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वयाच्या 89 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 24 नोव्हेंबर 2025ला बॉलिवूडच्या 'ही मॅन'चे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सध्या सोशल मीडियावर देओल कुटुंबाच्या प्रॉपर्टीची चर्चा पाहायला मिळत आहे. अशात आता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची धाकटी मुलगी अहाना देओल हिचा एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यात तिने धर्मेंद्र यांच्याकडून काय हवे, असल्याचे सांगितले आहे.

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची दोन लग्न झाली आहेत. पहिले प्रकाश कौर आणि दुसरे अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली आहेत एक ईशा देओल आणि दुसरी अहाना देओल. धर्मेंद्र यांना आपली सर्व मुलं खूप आवडती होती. त्याचे सर्वांवर खूप प्रेम होते. अहाना देओल लाइमलाइट पासून दूर आहे.

'हर झिंदगी बझ'ला दिलेल्या मुलाखतीत अहाना देओलला विचारण्यात आले की, "तुला वडिलांची कोणती गोष्ट वारसा म्हणून हवी आहे." यावर अहाना खास उत्तर दिले ती म्हणाली, "मला पप्पांची फियाट कार हवी आहे. ती पप्पांची पहिली कार होती. सुंदर विंटेज फियाट मला वारसा म्हणून हवी आहे. त्या कारच्या पप्पांशी जोडलेल्या असंख्य आठवणी आहेत. मला ती माझी बनवायची आहे."

पुढे अहाना देओल लहानपणीची आठवण सांगताना म्हणाली की, "मी सहा वर्षांचे होते. पप्पा त्यांच्या शेतात लोणावळ्याला जात होते. तेव्हा मी म्हणाले मला देखील जायचे आहे. त्यांनी पटकन माझी बॅग भरली आणि मला सोबत घेऊन गेले. कारमध्ये त्यांनी मला मांडीवर बसवले. ही माझी त्यांच्यासोबतची सर्वात आवडती आठवण आहे."

Ahana Deol
Suraj Chavan : सूरज चव्हाणचा रोमँटिक अंदाज; होणाऱ्या बायकोसोबत केले प्री-वेडिंग फोटोशूट, VIDEO होतोय व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com