Dharmendra : 'घेऊनी टांगा सर्जा निघाला...' धर्मेंद्र यांचं मराठी कनेक्शन, कोणत्या चित्रपटात केले काम?

Dharmendra Marathi Connection : धर्मेंद्र यांनी हिंदीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यांचे मराठीतही खास कनेक्शन आहे. धर्मेंद्र यांच्या मराठी कनेक्शनबद्दल जाणून घेऊयात.
Dharmendra Marathi Connection
DharmendraSAAM TV
Published On
Summary

वयाच्या 89 वर्षी बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे निधन झाले.

धर्मेंद्र यांच्या अभिनयाचे जगभरात चाहते आहेत.

हिंदीसोबत त्यांचे मराठी कनेक्शन देखील खूप खास आहे.

वयाच्या 89 वर्षी दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra ) यांचे निधन झाले आहे. त्यांनी 24 नोव्हेंबर 2025ला अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक होती. धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. हिंदीसोबतच त्यांचे मराठी कनेक्शन देखील आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी त्यांच्यासंबंधित पोस्ट करून आठवणींना उजाळा दिला.

अशात आता सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ समीक्षक पत्रकार दिलीप ठाकूर यांनी धर्मेंद्र यांचे मराठी कनेक्शन सांगितले आहे. ते मुलाखतीत धर्मेंद्र यांच्याबद्दल भरभरून बोले आहे. त्यांनी धर्मेंद्र यांचे कामाचे कौतुक केले आहे. तसेच त्यांचा साधा-भोळा स्वभाव, कामाची एकनिष्ठता यांबद्दल सांगितले. दिलीप ठाकूर नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

धर्मेंद्र यांचे मराठी कनेक्शनबद्दल बोलताना दिलीप ठाकूर म्हणाले की, "मराठी कनेक्शनपण चांगले आहे. हेमंत कदम नावाचे गृहस्त चांदिवली स्टुडिओचे मालक होते. हा स्टुडिओ आजही साकी नाका येथे आहे. त्यांनी 'हिचं काय चुकलं' हा मराठी सिनेमा केला. चित्रपटात विक्रम गोखले आणि धर्मेंद्रजी यांचे 'घेऊनी टांगा सर्जा निघाला' असे घोडागाडीमधील गाणे आहे. याचे चित्रीकरण २-३ दिवसांत झाले. धर्मेंद्रजींनी याला पूर्ण सहकार्य दिले. मराठी चित्रपटात आपण चांगले काम करू अशी त्यांची भावना होती. चांदिवली स्टुडिओमध्ये वारंवार काम करून त्यांचा हेमंत कदम यांच्याशी चांगला परिचय झाला होता. त्यांच्यात मैत्रीची भावना होती. त्यांनी मैत्रीसाठी काम केले.

दिलीप ठाकूर पुढे म्हणाले की, "अर्जुन हिंगोराणी यांचा 'कहानी किस्मत की' चित्रपटात 'रफ़्ता रफ़्ता देखो आँख मेरी लड़ी है...' गाणे आहे. ज्यात धर्मेंद्रजी रेखा यांना छेडतात. गाण्याचे शेवटचे कडवं शेतात शूट केले आहे. तेव्हा धर्मेंद्रजी आणि रेखा या महाराष्ट्रीयन वेशात दिसले. मग किशोर कुमार याचे "अगं पांडोबा फसली रे फसली, जवळ ये लाजू नको" गायलेले एक प्रसिद्ध वाक्य आहे. जे पडद्यावर धर्मेंद्र यांनी साकारले. हा मराठी टच उल्लेखनीय आहे. "

Dharmendra Marathi Connection
Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com