Dharmendra Death: महानतेचं उदाहरण...! धर्मेंद्र यांच्या निधनाने अमिताभ बच्चन भावूक, जिगरी दोस्तासाठी लिहिली खास पोस्ट

Amitabh Bachchan and Dharmendra: सोमवारी धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि संपूर्ण सिनेसृष्टीवर एकच शोककळा पसरली. आपला जिगरी दोस्त गमावल्यानंतर महान अभिनेते अमिताभ बच्चन यांनी खास पोस्ट लिहीली आहे.
Amitabh Bachchan and Dharmendra
Amitabh Bachchan and Dharmendrasaam tv
Published On

बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांमध्ये धर्मेंद्र यांची गणना केली जात होती. धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. मात्र काल धमेंद्र यांनी जगाचा निरोप घेत अलविदा केलं. वयाच्या 89 वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीर्घ काळापासून ते आजारी होते आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरीच होते.

तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या बॉलिवूडच्या ही-मॅन धर्मेंद्र यांची काल राहत्या घरी प्राणज्योत मालवली. धमेंद्र यांचे जिवलग मित्र अमिताभ बच्चन यांनी नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण केलीये.

Amitabh Bachchan and Dharmendra
Dharmendra Ikkis Film: 'वो इक्कीस का था...', धर्मेद्र यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज, फोटो पाहून चाहते इमोशनल

अमिताभ बच्चन यांची भावनिक पोस्ट

X वर अमिताभ बच्चन यांनी आपल्या मित्र धर्मेंद्रसाठी काही खास लिहिलं आहे. ते म्हणतात, “एक आणखी दिग्गज आपल्याला सोडून गेलाय.. तो जणू एक मैदान रिकामं करून गेलाय.. मागे अशी शांतता ठेवून गेला जी सहन करणं अशक्य आहे.

धरमजी, महानतेचे उदाहरण, जे केवळ त्यांच्या शारीरिक उपस्थितीसाठीच नाही तर त्यांच्या मोठ्या मनासाठी आणि साधेपणासाठी सर्वाच्या नेहमी लक्षात राहतील. ते पंजाबच्या गावातून आले होते, ते तिथल्या मातीप्रमाणे असून त्याच स्वभावाशी प्रामाणिक राहिले. त्यांच्या उत्तम करियरमध्ये प्रत्येक दशकात बदल झाले. मात्र त्यांच्यात कधीही बदल झाला नाही.

त्यांचं स्मितहास्य, त्यांचा चार्म आणि त्यांची आपुलकी, जे त्यांच्या आसपास येणाऱ्या प्रत्येकाला जाणवलं. आपल्या आसपास आता एक पोकळी निर्माण झाली आहे जी कायमची राहील.

83 वर्षीय अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवरून स्पष्ट होतंय की, धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांना किती मोठा धक्का बसला आहे. आता प्रेक्षकांना दोघांची ‘जय आणि वीरू’ची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार नाही. ‘शोले’ सिनेमात त्यांची घट्ट मैत्री जशी पडद्यावर होती तशीच खऱ्या आयुष्यात देखील होती.

Amitabh Bachchan and Dharmendra
हिंदी सिनेसृष्टीचा 'ही मॅन' काळाच्या पडद्याआड; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

शाहरुख खानने धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. शाहरूखने त्याच्या एक्स हँडलवर लिहिलंय की, "धर्मजी, तुम्हाला शांती लाभो. तुम्ही माझ्यासाठी वडिलांसारखे होतात... तुम्ही माझ्यावर केलेले सर्व आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल धन्यवाद. हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नाही तर जगभरातील चित्रपट आणि चित्रपट प्रेमींसाठी एक मोठं आणि कधीही भरून न येणारे नुकसान आहे. तुम्ही अमर आहात आणि तुमचा आत्मा तुमच्या चित्रपटांमधून आणि तुमच्या सुंदर कुटुंबातून जिवंत राहील."

Amitabh Bachchan and Dharmendra
खरे 'ही मॅन', ते कायम आठवणीत राहतील; धर्मेंद्र यांच्या निधनानंर सचिन पिळगावकरांची भावनिक पोस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com