Suraj Chavan : सूरज चव्हाणचा रोमँटिक अंदाज; होणाऱ्या बायकोसोबत केले प्री-वेडिंग फोटोशूट, VIDEO होतोय व्हायरल

Suraj Chavan Pre Wedding Photoshoot : गुलीगत किंग लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नुकतेच सूरज चव्हाणने प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Suraj Chavan Pre Wedding Photoshoot
Suraj ChavanSAAM TV
Published On
Summary

सूरज चव्हाणच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे.

सूरज चव्हाण मामाची मुलीसोबत लग्न करतोय.

सूरज चव्हाणने नुकतेच प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे.

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे. नुकतेच अंकिता वालावलकर सूरजचे थाटात केळवण केले आहे. त्यानंतर सूरजच्या लग्नाची शॉपिंग देखील करण्यात आली. त्यानंतर गुलीगत सूरज आपल्या नवीन घरात देखील गेला. आता सूरज चव्हाणच्या सूरज चव्हाणच्या प्री-वेडिंग शूटचा व्हिडीओ समोर आला आहे. सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचे नाव संजना आहे. सूरज मामाची मुलीसोबत लग्न करतोय.

सूरज चव्हाणच्या प्री-वेडिंग शूटचा एक व्हिडीओ सोशल मिडिया तुफान व्हायरल होत आहे. ज्यात सूरज चव्हाण आणि पत्नी संजनाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. त्यांनी प्री-वेडिंगचे एकूण तीन लूक केले आहेत. पहिला वेस्टन लूक आहे. ज्यात सूरज चव्हाण सुटाबुटात पाहायला मिळत आहे. तर सूरजची होणारी पत्नी संजनाने लाल रंगाचा गाऊन परिधान केला आहे. मिनिमल मेकअप, मॅचिंग ज्वेलरी, केसांची सुंदर हेअर स्टाइल करून हा लूक पूर्ण केला आहे. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांना गुंतलेले पाहायला मिळत आहे.

दुसरा लूक हा पारंपरिक आहे. ज्यात सूरजने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी आणि संजनाने लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला आहे. दोघे एकत्र खूपच क्यूट दिसत आहेत. तर तिसरा कॅज्युअल लूक केला आहे. ज्यात सूरज डेनिम शर्ट आणि पॅन्ट घातली आहे. तर संजनाने पांढऱ्या वेस्टन ड्रेसवर डेनिम जॅकेट परिधान केले आहे. सूरज प्रेमाने संजनाला लाल गुलाबाचे फुल देताना दिसत आहे. दोघांच्या क्यूट अंदाजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सूरज चव्हाणच्या प्री-वेडिंग शूटच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते त्यांच्या केमिस्ट्रीचे कौतुक करत आहे. हे सुंदर प्री-वेडिंग शूट पुण्यातील Pixel city या भन्नाट लोकेशनवर झाले आहे. सूरज चव्हाणचा मॉडर्न लूक चाहत्यांना भलताच आवडला आहे. झापुक झुपूक स्टाइलमध्ये सूरज चव्हाण नोव्हेंबर 2025 महिन्यात बोहल्यावर चढणार आहे. सूरज चव्हाण 29 नोव्हेंबर 2025 थाटामाटात लग्न करणार आहे.

Suraj Chavan Pre Wedding Photoshoot
Masti 4 vs 120 Bahadur : '120 बहादूर' फ्लॉप की हिट? तिकिट खिडकीवर कोणी मारली बाजी? वाचा कलेक्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com