Suraj Chavan Wedding : सूरज चव्हाण लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नाची तारीख आली समोर

Shreya Maskar

सूरज चव्हाण लग्न

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे. नुकतेच अंकिता वालावलकर सूरजचे थाटात केळवण केले आहे.

Suraj Chavan Wedding | instagram

लग्नाची शॉपिंग

अंकिता सूरजच्या लग्नाची शॉपिंग करताना दिसली. अंकिता आणि सूरजची 'बिग बॉस मराठी 5' च्या घरात घट्ट मैत्री झाली. सूरज अंकिताला बहीण मानतो.

Suraj Chavan Wedding | instagram

लग्नाची पत्रिका

झापुक झुपूक स्टाइलमध्ये सूरज चव्हाण नोव्हेंबर 2025 महिन्यात बोहल्यावर चढणार आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Suraj Chavan Wedding | instagram

लग्नाचा मुहूर्त

सूरज चव्हाण 29 नोव्हेंबर 2025 थाटामाटात लग्न करणार आहे. संध्याकाळी 6.11 चा लग्नाचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे.

Suraj Chavan Wedding | instagram

साखरपुडा - हळद

साखरपुडा आणि हळदही 29 नोव्हेंबर पार पडणार आहे. साखरपुडा दुपारी 12.00 वाजता आणि हळद दुपारी 2 वाजता लागणार आहे.

Suraj Chavan Wedding | instagram

बायको कोण?

सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचे नाव संजना आहे. सूरज मामाची मुलीसोबत लग्न करतोय. सूरज चव्हाणचे चाहते त्याच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Suraj Chavan Wedding | instagram

लग्नाचे लोकेशन

सूरज चव्हाणचे लग्न माऊली गार्डन हॉलवर होणार आहे. हे ठिकाण सासवड-जेजुरी रोड, पुरंदर तालुक्यात , पुणे जिल्ह्यात आहे.

Suraj Chavan Wedding | instagram

शुभेच्छांचा वर्षाव

सूरजला लग्नासाठी चाहते, कलाकार मंडळी शुभेच्छा देताना दिसत आहे. तसेच लग्नाच्या आधी सूरजने नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.

Suraj Chavan Wedding | instagram

NEXT : सूरज चव्हाणचा आलिशान, लग्जरी बंगला पाहिला का?

Suraj Chavan | saam tv
येथे क्लिक करा...