Shreya Maskar
'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणने आपल्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
सूरज चव्हाणने हातात लक्ष्मी देवीचा फोटो घेऊन सूरजने गृहप्रवेश केला. घरात पूजा केली.सूरज चव्हाण हा बारामती तालुक्यातील मोढवे गावातील रहिवासी आहे.
गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला त्याच्या घरातील कुटुंबीय, गावकरी आणि लहान मुलं पाहायला मिळाली. सूरज चव्हाण नवीन घरात जाऊन खूपच खुश आहे.
सूरज चव्हाणचा नवीन आलिशान बंगला दुमजली आहे. त्याचे घर प्रशस्त आणि मोठे आहे.
फ्लोरिंग, घराच्या खिडक्या, मॉड्यूलर किचन, बाल्कनी सर्वकाही चकचकीत आहे. मोठ्या हॉलने घराची शोभा वाढवली आहे.
घराबाहेर मोठा हिरवागार गार्डन एरिया पाहायला मिळत आहे. जेथे मुलं खेळताना दिसत आहेत.
सूरजचे नवीन घर खूपच स्टायलिश आणि मॉडर्न आहे. सूरजच्या घराचे इंटिरियर लय भारी आहे.
सूरजच्या नवीन घराचे कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे. गुलीगत स्टाइलमध्ये सूरजचे नवीन घर बनलं आहे.