Shreya Maskar
अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहचा 'दे दे प्यार दे 2' रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 14 नोव्हेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
'दे दे प्यार दे 2' चित्रपट 2019 साली रिलीज झालेल्या 'दे दे प्यार दे' सिनेमाचा सीक्वल आहे. 'दे दे प्यार दे' चित्रपटही खूप गाजला होता. चित्रपटाची गाणी आजही प्रेक्षकांना आवडतात.
'दे दे प्यार दे 2' चित्रपट अंशुल शर्मा दिग्दर्शित आणि लव रंजन आणि तरुण जैन यांनी लिहिलेले आहे. चित्रपटाची कथा खूपच भन्नाट आहे.
'दे दे प्यार दे 2'मध्ये अजय-रकुलसोबतच आर माधवन, गौतमी कपूर, जावेद जाफरी, मीजान जाफरी, इशिता दत्ता आणि जानकी बोडीवाला हे कलाकार झळकले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 'दे दे प्यार दे 2' चित्रपट नवीन वर्षात (2026) ला ओटीटीवर येणार आहे. तो जानेवारी महिन्यात पाहता येणार असल्याचे बोले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'दे दे प्यार दे 2' चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत. त्यामुळे चित्रपट नेटफ्लिक्सवर नवीन वर्षात पाहायला मिळेल.
Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, 'दे दे प्यार दे 2' सिनेमाने दोन दिवसांत तब्बल 21 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये तुफान वाढ होत आहे.
'दे दे प्यार दे 2' सिनेमा हाऊसफुल पाहायला मिळत आहे. तसेच अजय-रकुलच्या केमिस्ट्रीचे नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत.