Shreya Maskar
मराठी लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी सुमित कायम आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. आजवर तिने अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
चिन्मयी सुमित कोणत्याही कार्यक्रमात गेल्यावर भाषणाची सुरुवात "नमस्कार, जय भीम!" असे बोलून करते.
अलिकडेच अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे 13 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन पार पडले. तेव्हा अभिनेत्रीने "नमस्कार, जय भीम!" बोलण्यामागचा अर्थ सांगितला.
अभिनेत्री म्हणाली की, मला खूप लोक विचारतात की "तुम्ही जय भीमवाल्या आहात का? " यावर सडेतोड उत्तर चिन्मयी सुमितने कार्यक्रमात दिले.
चिन्मयी सुमित म्हणाली की, "होय! मी त्यांच्यातली आहे. मी आंबेडकरांची आहे. मी आंबेडकरांची फॅन आहे. मला वाटते की भारतातल्या प्रत्येक महिलेला 'जय भीम' बोलावेसे वाटले पाहिजे."
शेवटी अभिनेत्री म्हणाली की, "सर्वांना माणसाचा दर्जा राज्यघटनेमुळे दिला गेलाय. राज्यघटनेचे घटनाकार म्हणून बाबासाहेबांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी 'नमस्कार, जय भीम' असे बोलते. "
चिन्मयी सुमितचे हे विधान सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
चिन्मयी सुमित 'मुरांबा', 'फुलवंती', 'पोरबाजार', 'हृदयनाथ' यांसारखे हिट चित्रपट केले आहेत. तसेच 'जीव झाला येडा पिसा',' प्रेमा तुझा रंग कसा', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकांमध्ये काम केले आहे.