Shreya Maskar
आज (13 नोव्हेंबर) बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावलाचा वाढदिवस आहे. आज जूही चावला 58 वर्षांची झाली आहे.
जूही चावला व्यवसायातून बक्कळ पैसा कमावते. तसेच कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आयपीएल संघाचा ती एक भाग आहे. तसेच ती तिच्या पतीच्या मेहता ग्रुपद्वारे इतर व्यवसायिक गुंतवणुकीतून करते.
अभिनय क्षेत्र, ब्रँड जाहिराती, रिॲलिटी शोचे जज यामधून पैसा कमावते. चित्रपट निर्मितीतून, रिअल इस्टेटमधून जूही कमाई करते.
जूही चावलाचा पहिला चित्रपट 1986चा 'सल्तनत' (Sultanat) होता. ज्यामध्ये तिने एक छोटी भूमिका केली होती. 1988 चा 'कयामत से कयामत तक' (Qayamat Se Qayamat Tak) या चित्रपटात ती मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली.
जूही चावलाकडे लग्जरी कारचे कलेक्शन आहे. यात. एस्टन मार्टिन रैपिड बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, जॅग्वार, पोर्श केयेन यांसारख्या आलिशान कारचा समावेश आहे.
जूही चावलाची मुंबईत मलबार हिल, गुजरातमधील पोरबंदर येथे आलिशान बंगला आहे. जूही एक लग्जरी आयुष्य जगत आहे.
जुही चावलाने 1995 ला उद्योगपती जय मेहताशी लग्न केले. त्यांना जाह्नवी मेहता आणि अर्जुन मेहता अशी दोन मुलं आहेत.
जुही चावलाने एका जाहिरातीसाठी जवळपास 40 ते 60 लाख रुपये मानधन घेते. मीडिया रिपोर्टनुसार, जूही चावलाची एकूण संपत्ती अंदाजे ₹7,790 कोटी रुपये आहे.