Shreya Maskar
प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्या लेकीचा शाही विवाह सोहळा पार पडला आले. नुकतेच सुदेश भोसले यांच्या लेकीने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
सुदेश भोसले यांच्या लेकीचे नाव श्रुती भोसले आहे. श्रुतीने अभिनेता प्रतीक देशमुखसोबत लग्नगाठ बांधली आहे.
श्रुतीचा नवरा आणि भोसले कुटुंबाचा जावई प्रतीक देशमुख हा उत्तम अभिनेता, लेखक, निर्माता आणि इंजिनिअर आहे. प्रतीकने 'शुभ लग्न सावधान' चित्रपटात काम केले आहे.
श्रुती आणि प्रतीकने कुटुंबातील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. लग्नाला जवळचे मित्रमंडळी, कुटुंबीय यांनी उपस्थिती लावली.
10 नोव्हेंबर 2025 ला प्रतीक आणि श्रुती लग्नबंधनात अडकले. श्रुती आणि प्रतीकने पुण्यात लग्न केले. दोघे एकत्र खूपच सुंदर दिसत होते.
ऑक्टोबर महिन्यात श्रुती आणि प्रतीकने गुपचूप साखरपुडा उरकला होता. फोटो शेअर करून त्यांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला.
श्रुती आणि प्रतीकने लग्नात पारंपरिक लूक केला होता. श्रुतीने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. पारंपरिक दागिने, केसात गजरा, नाकात नथ घालून नवरी सजली. तर प्रतीकने गोल्डन, पिवळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.
सध्या श्रुती आणि प्रतीकवर चाहते आणि कलाकार मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.