Shreya Maskar
'बिग बॉस मराठी 5'मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेला सूरज चव्हाण आता लग्न बंधनात अडकणार आहे. गेल्या काही महिन्यापासून त्याच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
सूरजने काही महिन्यापूर्वी एका मुलीसोबत फोटो शेअर केला होता. ज्यात त्या मुलीचा चेहरा दिसत नव्हता. तेव्हा पासून सूरजच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळाली.
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर सूरजला भेटायला घरी गेली. तेव्हा तिने एक खास व्हिडीओ शेअर करून सूरजचं खरंच लग्न ठरलं असल्याची माहिती दिली. तेव्हापासून सूरज चव्हाणची होणारी बायको पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
सूरजची बायको खूपच सुंदर दिसते. दोघांना एकत्र पाहून चाहते खुश झाले आहेत.
नुकतेच अंकिता वालावलकरने सूरजचे थाटामाटात घरी केळवण केले. त्यामुळे आता सूरज लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. मात्र अद्याप लग्नाची तारीख समोर आली नाही.
सूरज चव्हाणने उखाण्यातून आपल्या बायकोचे नाव सांगितले आहे. तो उखाणा घेत म्हणाला, "बिग बॉस जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न, संजनाचं नाव घेतो... बोलो होतो ना आधी करिअर मग लग्न"
तर दुसरीकडे संजनाने देखील होणाऱ्या नवऱ्याचे नाव हटके अंदाजात घेतले आहे. ती म्हणाली की, "बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको, सूरज रावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको!"
अलिकडेच सूरज चव्हाण 'झापुक झुपूक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटातील त्याचा अनुभव प्रेक्षकांना खूप आवडला आहे. आता सूरज लवकरच आपल्या नवीन घरात देखील शिफ्ट होणार आहे.