Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
तेजस्विनीने पिवळ्या रंगाची हिरव्या काठापदराची साडी नेसली आहे. तिने हा पारंपरिक लूक साखरपुड्याला केला होता.
केसांचा बन, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, साडीला मॅचिंग ज्वेलरी आणि ग्लॉसी मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
तेजस्विनीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
फोटोंमध्ये ती खूपच आनंदी दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरची स्माइल पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
अलिकडेच तेजस्विनी लोणारीने शिंदेंच्या शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी थाटामाटात साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
तेजस्विनी लवकरच सरवणकरांची सून होणार आहे. तेजस्विनी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची चाहते वाट पाहत आहेत.
तेजस्विनी लोणारीने मराठीसोबत हिंदीमध्येही काम केले आहे. तेजस्विनी टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.