ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवाळीच्या काळात चेहरा चमकदार राहण्याकरिता चेह-यावर बेसन आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक लावू शकता.
एक चमचा बेसनमध्ये अर्धा चमचा गुलाब पाणी आणि थोडी हळद मिक्स करा.
हे मिश्रण चेह-यावर आणि मानेवर एकसमान लावा आणि लावून झाल्यानंतर १५ मिनिटे सुकत ठेवा.
त्यानंतर, कोमट पाण्याने चेहरा धुवा. त्वचा एकदम साफ आणि गुळगुळीत होईल.
हा फेसपॅक त्वचेवरील टॅनींग घालवण्याकरिता आणि त्वचेला नॅचरल ग्लो देण्याकरिता मदत करते.
हा फेसपॅक पूर्णपणे नॅचरल आहे, त्यांनी त्वचेवर कोणतेही साइड इफेक्ट होत नाही.