ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवाळी सण हा संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे. दिवाळी सणाच्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्व आहे.
दिवाळी सणाला पहिली पहाट असते. या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते. दिवाळीत नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची जुनी परंपरा आहे. अंगाला तेल, उटणे लावून ब्रह्ममुहूर्तावर स्नान केले जाते.
अभ्यंगस्नान करताना संपूर्ण अंगाला उटणे लावले जाते शरीराला उटणे लावण्याचे आयुर्वेदिक फायदे आहेत.
यासाठी तुम्ही बाजारातील उटणं न वापरता घरच्याघरी नैसर्गिक पद्धतीचं उटणं तयार करू शकता.
नैसर्गिक पद्धतीचं उटणं तयार करण्यासाठी तुम्ही मसूर डाळ, गुलाब जल, जेष्ठमध, चंदन, हळद, कमळ पूर्ण, दूध या साहित्याचा वापर करा.
उटणं तयार करण्यासाठी तुम्ही चंदन,बेसन, मसूर डाळ यामध्ये मध मिक्स करा. संपूर्ण मिश्रणात दूध मिक्स करा. मात्र मिश्रण जास्त घट्ट आणि जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
चंदन,बेसन, मसूर डाळ हे मिक्स करून यामध्ये तुम्ही हळद मिक्स करा ज्यामुळे त्वचेला कोणतीही अॅलर्जी होणार नाही.
दिवाळीनिमित्त या चार प्रकारचे नैसर्गिक उटणं तुम्ही घरीच करू शकता. हे उटणं तुम्ही केवळ दिवाळीतच नाही तर नियमितपणे आठवड्यातून दोन वेळा स्नान करण्यापूर्वी लावा.