Manasvi Choudhary & ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला दिवाळी सण साजरा होतो. यंदा १८ ऑक्टोबरपासून दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्व आहे. दिवाळी सणाच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीगणेशाची पूजा केली जाते.
यावर्षी, ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टीकोनातून दिवाळी विशेष असणार आहे. दिवाळीच्या दिवशी शनीचा सर्व ग्रहांवर प्रभाव पडणार आहे ज्यामुळे धन राजयोग निर्माण होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीचे भ्रमण दिवाळीत होणार आहे ज्यामुळे काही राशींसाठी यंदाची दिवाळी खास आहे.
व्यक्तीच्या आयुष्यात शनिदेवाला विशेष महत्व आहे. शनी व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो जेव्हा शनीचे नक्षत्र बदलते तेव्हा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो. यावर्षी धनराज योगाचा दिवाळीत कोणत्या राशींना फायदा होणार आहे हे जाणून घेऊया.
वृषभ रास असलेल्या व्यक्तीसाठी शनीचा धन राजयोग आर्थिक चणचण दूर करणार आहे. तसेच तुमची रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
मिथुन राशीसाठी नवीन काम करण्यासाठी हा काळ शुभ असणार आहे. गुंतवणूक करण्यासाठी चांगले दिवस आहेत.
मकर राशीचा शनीचा धन राजयोग चांगली संधी घेऊन येत आहे. अचानक पैशांचा मोठा लाभ होणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळेल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य लाभ घ्या.