Shruti Vilas Kadam
जाह्नवी कपूरने परिधान केलेला निळ्या रंगाचा लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर अर्पिता मेहता यांनी डिझाइन केला आहे. या लेहेंगामध्ये सुंदर सिक्विन व मिरर वर्क असून, तो तिच्या लुकला राजेशाही टच देतो.
या लेहेंगा सेटची किंमत तब्बल ७८,००० रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते.
गडद निळ्या रंगाच्या या लेहेंगाला हलकासा शिमरी टच देण्यात आला आहे. पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही फॅशन घटकांचा सुंदर मिलाफ यात दिसतो.
जाह्नवीने या लुकसाठी फारसे दागदागिने न वापरता मिनिमल स्टाइलिंग केली आहे. त्यामुळे तिचा पोशाख अधिक उठून दिसतो आणि फॅशन जगतात “क्लास विथ एलिगन्स” म्हणून हा लुक ओळखला जातो.
तिने सॉफ्ट न्यूड मेकअप, हलका ब्लश आणि नैसर्गिक लहरी केस ठेवले आहेत. हा मेकअप लेहेंगाच्या शिमरी लुकला पूर्णतः पूरक ठरतो.
जाह्नवी कपूरने हा निळा लेहेंगा परिधान करत फॅशन शोमध्ये शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर वॉक केला. तिच्या ग्रेसफुल स्टाईल आणि कॉन्फिडन्सने सर्वांचे लक्ष वेधले.
जाह्नवीचा हा पारंपरिक आणि ग्लॅमरस लुक अनेक तरुणींसाठी फेस्टिव्हल आणि लग्न समारंभासाठी प्रेरणादायी ठरत आहे. आधुनिक कट्स आणि पारंपरिक नक्षीकाम यांचा उत्तम समन्वय यात दिसतो.