Courtroom Drama: इमरान हाश्मीचा 'हक' पाहायला जायचा प्लॅन करताय? त्याआधी ओटीटीवर पाहा 'हे' कोर्टरूम ड्रामा चित्रपट

Shruti Vilas Kadam

पिंक (2016)

अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू अभिनीत हा चित्रपट महिलांच्या संमती, प्रतिष्ठा आणि न्यायप्रणालीवर आधारित आहे. या चित्रपटातील “नो मिन्स नो” हा संवाद समाजात मोठा संदेश देणारा ठरला.

Courtroom Drama

जॉली LLB (2013)

अरशद वारसी आणि बोमन इरानी यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट न्यायालयातील विनोदी पण वास्तववादी संघर्ष दाखवतो. न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकतो.

Courtroom Drama

जॉली LLB 2 (2017)

अक्षय कुमारचा दमदार अभिनय असलेला हा सिक्वेल भ्रष्टाचार आणि न्यायासाठी लढणाऱ्या एका वकिलाची प्रेरणादायी कथा सांगतो.

Courtroom Drama

सेक्शन 375 (2019)

रिचा चड्ढा आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बलात्काराच्या प्रकरणातील नैतिकता, पुरावे आणि कायद्याच्या गुंतागुंतींची वास्तववादी मांडणी करतो.

Courtroom Drama

ऐतराज (2004)

प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार आणि करीना कपूर यांच्या भूमिका असलेला हा कोर्ट ड्रामा लैंगिक छळ आणि लिंगभेदावर आधारित आहे.

Courtroom Drama

शाहिद (2013)

वास्तव घटनांवर आधारित हा चित्रपट वकील शाहिद आझमी यांच्या जीवनावर आहे. राजकीय आणि सामाजिक दबावातही त्यांनी न्यायासाठी केलेली झुंज यात दिसते.

Courtroom Drama

रुस्तम (२०१६)

अक्षय कुमार साकारलेल्या नेव्हल ऑफिसरच्या भूमिकेतून प्रेम, धोका आणि न्यायालयीन लढाईचा मिलाफ दाखवणारा हा चित्रपट देशभक्ती आणि प्रेमावर आधारित आहे.

Courtroom Drama

पहिल्यांदाच निवडणूक लढवणारी मैथिली ठाकूर संगीत कार्यक्रमासाठी किती मानधन घेते?

Maithili Thakur
येथे क्लिक करा