Shruti Vilas Kadam
मैथिली ठाकूरचा जन्म २५ जुलै २००० रोजी मधुबनी (बिहार) येथे झाला. सध्या ती २५ वर्षांची आहे.
तिचे वडील रमेश ठाकूर हे संगीत शिक्षक आहेत. मोठा भाऊ ऋषभ तबला वादक असून धाकटा भाऊ अयाची देखील गायक आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून मैथिलीने संगीत शिकायला सुरुवात केली.
मैथिलीने दिल्ली विद्यापीठाच्या भारती कॉलेजमधून कला शाखेत (B.A.) पदवी घेतली आहे.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत मैथिली ठाकूरने अलीनगर मतदारसंघातून भाजपा उमेदवारी दाखल केली आहे. ही तिची पहिलीच राजकीय पायरी आहे.
मैथिली हिंदी, मैथिली, भोजपुरी, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये गाणी गाते. तिच्या “Maithili Thakur Official” या यूट्यूब चॅनेलला १ कोटींपेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहेत.
मैथिलीचा मुख्य उत्पन्न स्त्रोत म्हणजे गायन, यूट्यूब आणि लाइव्ह शो. एका कार्यक्रमासाठी ती सुमारे ५ ते ७ लाख रुपये मानधन घेते. तसेच यूट्यूबवरुन महिन्याला अंदाजे ९ ते १० लाख कमावते.
तिच्या प्रतिज्ञापत्रानुसार, मैथिली ठाकूरकडे एकूण २ कोटी ३२ लाख ३३ हजार २५५ रुपयांची संपत्ती आहे. यात १.८० लाख रोख रक्कम, वाहने, आणि दागिन्यांचा समावेश आहे.