बिग बॉस मराठी सीझन 3 चा विजेता जय दुधाणेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. जय दुधाणे हा एक सुप्रसिद्ध फिटनेस ट्रेनर, खेळाडू, मॉडेल आणि प्रसिद्ध अभिनेता आहे. तो ठाणे येथील रहिवासी असून जिम व्यावसायिक आहे. जयने बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदेशीर एक गाळा अनेक व्यक्तिना विकल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
यामुळे अनेक खरेदीदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या जय दुधाणे यांच्या कुटुंबाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये जय दुधाणे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह त्याचे आजोबा, आजी, आई आणि बहीण यांची चौकशी केली जात आहे. या तपासादरम्यान आणखी महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.
24 डिसेंबर 2025 रोजी जयने गर्लफ्रेंड आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षाला पाटीलशी लग्नगाठ बांधली होती. ठाणेमध्येच हा लग्नसोहळा पार पडला होता. त्यानंतर त्याने बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता आणि तो उपविजेताही ठरला होता. लग्नाच्या 11 दिवसांनंतर जय दुधाणेला पोलिसांनी अटक केली आहे. जय दुधाणे हा त्याच्या कुटुंबासह परदेशात चालला होता. या दरम्यानच त्याला पोलिसांनी अटक केली. पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप जय दुधाणेवर केला असून त्याला पोलिसांनी न्यायालयात नेले आहे.
यावेळी जय दुधाणेनी प्रतिक्रिया दिली आहे, तो म्हणाला, वडिलांची जबाबदारी घेतली आणि लोक माझ्यावर उलटले, पण सत्य लवकरच समोर येईल. मी कुठेही पळून गेलो नाही, जे आहे त्याला सामोरे जाणार आहे. पोलिसांनी माझ्या आजी-आजोबांवरही गुन्हे दाखल केले, हे दुर्दैवी आहे. गाळा विकल्याबाबत अफवा कोण पसरवत आहे तेच कळत नाही.
हा खोटा गुन्हा आहे, मी माझा चेहराही लपवलेला नाही. न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी हनिमूनसाठी परदेशात जात होतो, तेव्हाच विमानतळावर मला अटक करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.