

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी, साम टीव्ही
Bigg Boss Marathi 3 fame Jay Dudhane arrested : बिग बॉस मराठी सीजन ३ चा उपविजेता आणि अभिनेता जय दुधाने (Jay Dudhane) याला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळाच्या जवळ पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी जय याला बेड्या ठोकल्या आहेत. जय दुधाने हे फिटनेसच्या क्षेत्रात लोकप्रिय नाव आहे. बिग बॉस ३ मध्ये तो स्पर्धक राहिला होता. त्याने नुकतेच येडं लागलं प्रेमाचं' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता त्याच्यावर अटकेची कारवाई झाली.
बिग बॉस मराठी सीझन ३ चा विजेता जय दुधाणे याला ठाणे पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केली आहे. ५ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात जय दुधाणेवर गंभीर आरोप आहेत. दस्तऐवज बनावट करून एकाच दुकानांची अनेकांना विक्री केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात जय दुधाणेसह त्याचे आजी-आजोबा, आई आणि बहिणींचाही FIR मध्ये समावेश आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
जय दुधाणे हे फिटनेस क्षेत्रातील मोठं नाव आहे. त्याने नुकतेच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेय. एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला १३ चे विजेते त्याने पटकावले होते. तो बिग बॉस मराठी ३ चा रनर-अप राहिलाय.जय दुधाणे हा ठाण्यातील फिटनेस ट्रेनर, उद्योजक आणि अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. ठाण्यात त्यांचे 'फिटर्नल' जिम आणि 'मिस्टर इडली' रेस्टॉरंट आहे. काही मराठी मालिका व म्युझिक व्हिडिओमध्ये त्याने काम केलेय. डिसेंबर २०२५ मध्ये हर्षला पाटील यांच्यासोबत त्याचं लग्न झालेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.