Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०' मध्ये मराठमोळ्या चेहऱ्याचा धमाका! सलमान खानच्या शोमध्ये 'या' कलाकाराची थेट एन्ट्री; पाहा १६ स्पर्धकांची संपूर्ण यादी!

Bigg Boss 20 Contestants List : सलमान खानच्या 'बिग बॉस २०' ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. यंदा १६ स्पर्धक झळकले आहे, ज्यात एका मराठमोळ्या कलाकाराचा समावेश आहे. स्पर्धकांची यादी पाहा.
Bigg Boss 20 Contestants List
Bigg Boss 20 SAAM TV
Published On
Summary

सलमान खानच्या 'बिग बॉस २०' ला सुरुवात

'बिग बॉस २०' मध्ये मराठमोळ्या कलाकाराची एन्ट्री

यंदा घरात आले दमदार १६ स्पर्धक

बॉलिवूडचा भाईजान होस्ट करत असलेला लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस २०' ला अखेर सुरुवात झाली आहे. काल (६ सप्टेंबर) ला या शोचा ग्रँड प्रीमियर थाटामाटात पार पडला आहे. यंदाच्या सीझन मध्ये गायक, रॅपर, अभिनेता, अभिनेत्री, सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर , बॉक्सर देखील पाहायला मिळत आहे. ग्रँड प्रीमियरला भाईजानने थाटात एन्ट्री घेतली.

यंदा 'बिग बॉस २०' मध्ये मराठीचा डंका वाजला आहे. शो मध्ये मराठमोळ्या रॅपर युंग डीएसएने धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. युंग डीएसए खरे नाव हर्ष विजय माचारे आहे. हा पुणे येथे राहणारा भारतीय रॅपर आहे. जो त्याच्या देसी हिप-हॉप शैलीसाठी ओळखला जातो.ट्रॅप बीट्ससाठी तो प्रसिद्ध आहे. आता हा मराठमोळा कलाकार बिग बॉसच्या घरात कसा गेम खेळणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'बिग बॉस २०' च्या स्पर्धकांची लिस्ट

  1. माही विज

  2. कनिका मान

  3. आसिफ खान

  4. अरिश्फा खान

  5. काझी तौकीर

  6. ईशा रिखी

  7. रोहेद खान

  8. लव्ह गिल

  9. मेरी कोम

  10. तन्मय सिंग - ScoutOP

  11. गुल्लू (कुशल तन्वर)

  12. अमन गांधी

  13. उदिती सिंग

  14. रिती तिवारी

  15. आम्रपाली दुबे

  16. युंग डीएसए -हर्ष विजय माचारे - YUNG DSA

'बिग बॉस २०' ची थीम

'बिग बॉस २०' ची थीम ‘तथास-टू’ आहे. बिग बॉस 20 मध्ये 'अतिरिक्त जीवन दान' ट्विस्ट देखील असेल, जे स्पर्धकांना गेम दरम्यान अतिरिक्त जीवनरेखा देईल. आपल्याला पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात मोठा राडा होताना पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस २०' जिओ हॉटस्टार पाहायला मिळेल. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता पाहायला मिळेल.

Bigg Boss 20 Contestants List
Marathi Actor : "मी ब्रेक घेतोय..."; मराठमोळ्या अभिनेत्याचा मोठा निर्णय, कारण वाचून धक्का बसेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com