Pune Police: बनावट प्रमाणपत्रे दाखवत १९ उमेदवार झाले पोलिस, दोघांना बेड्या; पुणे पोलिस दलात खळबळ

Pune Police Recruitment: पुणे पोलिस दलातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बनावट प्रमाणपत्रे दाखवत १९ उमेदवार पोलिस झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोघांना अटक करण्यात आली.
Pune Police: बनावट प्रमाणपत्रे दाखवत १९ उमेदवार झाले पोलिस, दोघांना बेड्या; पुणे पोलिस दलात खळबळ
Pune PoliceSaam Tv
Published On
  • पुणे पोलिस भरती बनावट प्रमाणपत्र प्रकरण

  • पुणे पोलिस भरतीत बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा गैरवापर

  • १९ उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्रे दाखवून पोलिसात नोकरी मिळवली

  • कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांचा पोलिस भरतीत वापर

  • ड्रॅगनबोटच्या बनावट प्रमाणपत्रांचा गैरवापर

  • पुणे पोलिस भरती प्रकरणात दोघांना अटक

सचिन जाधव, पुणे

पुण्यात बनावट प्रमाणपत्राद्वारे पोलिस दलात नोकरी मिळवण्यात आल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. 'कुराश' या पारंपरिक कुस्तीच्या आणि 'ड्रॅगनबोट' या सामूहिक नौकानयनाच्या खेळांची बनावट प्रमाणपत्रे तयार करून सरकारची फसवणूक करण्यात आली. पुणे शहर पोलिस दलात १९ उमेदवारांची भरती झाली असल्याची माहिती उघड झाली. त्यामुळे पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र सरकारकडून खेळाडूंसाठी लागू करण्यात आलेल्या ५ टक्के आरक्षणाचा गैरमार्गाने फायदा घेऊन पुणे शहर पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Pune Police: बनावट प्रमाणपत्रे दाखवत १९ उमेदवार झाले पोलिस, दोघांना बेड्या; पुणे पोलिस दलात खळबळ
Pune News: डीजेविरोधात बोलणाऱ्या बापटांवर हल्ला, पुण्याला लाज आणणारी मंडळ अध्यक्षाची गुंडगिरी; पाहा VIDEO

महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश विठ्ठल नागर (वय ४०, रा. चंडीगड, मूळ रा. अहिल्यानगर) आणि सचिव शिवाजी साळुंखे (वय ४६, रा. फुरसुंगी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह परभणी जिल्हा संघटक कल्याण बालासाहेब मुरकुटे, धाराशिव जिल्हा संघटक चांदपाशा लालासाहेब शेख, इतर जिल्ह्यांचे संघटक आणि अन्य आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Pune Police: बनावट प्रमाणपत्रे दाखवत १९ उमेदवार झाले पोलिस, दोघांना बेड्या; पुणे पोलिस दलात खळबळ
Pune News: पुण्यात चाललंय तरी काय? खड्ड्यांवर बोलाल तर जेलमध्ये जाल, यूट्युबर संतोष पंडित यांना अटक

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार २०१६ ते २०२६ या दरम्यानच्या कालावधीत घडला असून भरती उमेदवारांपैकी ९ जण प्रशिक्षणासाठी गेल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. पुणे शहर पोलिस दलातील २०२४-२६ या वर्षातील पोलिस भरतीत १९ उमेदवारांनी 'कुराश' आणि 'ड्रॅगनबोट' खेळांचे खोटे प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याची तक्रार एका व्यक्तीने पुराव्यांसह दिली होती.

Pune Police: बनावट प्रमाणपत्रे दाखवत १९ उमेदवार झाले पोलिस, दोघांना बेड्या; पुणे पोलिस दलात खळबळ
Pune News: पुण्यात डीजे अंगावर पडून महिलेचा मृत्यू, दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान भयंकर घडलं

तपासात आरोपींनी २०१६ ते २०२६ दरम्यान कोणतीही स्पर्धा न घेता बनावट कागदपत्रे आणि क्रीडा अभिलेख तयार केल्याचे समोर आले. शिवाजीनगर येथील पोलिस मैदानावर भरतीवेळी ही बनावट प्रमाणपत्रे सादर करून सरकारची फसवणूक करण्यात आली, असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात पोलिस दलातील आणि क्रीडा विभागातील काहीजण असण्याची शक्यता आहे तसा तपास केला जात आहे.

Pune Police: बनावट प्रमाणपत्रे दाखवत १९ उमेदवार झाले पोलिस, दोघांना बेड्या; पुणे पोलिस दलात खळबळ
Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात DJ वाजणार, मंडळांना दिलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com