School Close : परभणी आणि लातूरमधील सर्व शाळांना सुट्टी; बीड, धाराशिव आणि नांदेडमध्ये बंदची हाक, नेमकं कारण काय?

Marathwada Bandh Today: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात आंदोलन तीव्र झाले आहे. परभणी, लातूर, बीड, धाराशिव आणि नांदेडमध्ये बंदची हाक असून परभणी व लातूरमध्ये शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
School Holiday:  शाळा-कॉलेजला शनिवारी सुट्टी जाहीर, नेमकं कारण काय?
School HolidaySaam Tv
Published On

Marathwada bandh today September 3 : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण मराठवाड्यात बंद पाळला जात आहे. परभणी आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Parbhani Latur schools closed today)

परभणी, लातूर, बीड, धाराशिव आणि नांदेड या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे. संपूर्ण मराठवाड्यात या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सर्वत्र कडकडीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील बिघडती परिस्थिती पाहता पोलीस प्रशासनाकडून सर्व महत्त्वाच्या चौक, महामार्ग आणि सरकारी कार्यालयांबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे.

School Holiday:  शाळा-कॉलेजला शनिवारी सुट्टी जाहीर, नेमकं कारण काय?
PM Kisan Installment : शेतकर्‍यांच्या खात्यात ₹2,000 येणार की ₹4,000? पीएम किसानच्या हप्त्याची अपडेट समोर

परभणी- लातूर या जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या परभणी जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लातूर जिल्ह्यासह औसा, अहमदपूर आणि मुरुड परिसरात कडकडीत बंद पाळला जात आहे. येथे शाळा, महाविद्यालयांसह मुख्य बाजारपेठांमधील सर्व व्यवहार ठप्प असून आंदोलकांकडून भव्य रॅली काढण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. जरांगेंची प्रकृती खालावत असतानाही शासन शिष्टमंडळ भेट घेत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

School Holiday:  शाळा-कॉलेजला शनिवारी सुट्टी जाहीर, नेमकं कारण काय?
Pune : पुण्यात खळबळ! मध्यरात्री प्रसिद्ध रीलस्टारला पोलिसांनी उचललं; अटकेचा LIVE व्हिडिओ समोर

धाराशिव जिल्ह्यासह तुळजापूर, लोहारा, उमरगा, भूम, परंडा, वाशी आणि कळंब या सर्व तालुक्यांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

नांदेड जिल्ह्यात आंदोलनाला गटबाजीचे स्वरूप आले आहे. एका गटाने आज (३ सप्टेंबर) बंद आणि रास्ता रोकोची हाक दिली आहे, तर दुसऱ्या गटाने ४ सप्टेंबर रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. यामुळे नागरिक आणि पोलिसांमध्ये कायदा-सुव्यवस्थेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

नांदेडच्या कंधार येथे मराठा कार्यकर्त्यांनी थेट तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून 'शोले' स्टाईल आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com