Bigg Boss Marathi: 'गळ्यात दोरी अडकली...'; कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा, संकेत दोऱ्यांमध्ये अडकला अन्...

Bigg Boss Marathi: यावेळी बिग बॉसध्ये वेगळाच राडा पाहायला मिळणार आहे. कॅप्टन्सीचा टास्क खेळताना स्पर्धकांना यावेळी त्रास सहन करावा लागणार आहे.
Bigg Boss Marathi
Bigg Boss MarathiSaam tv
Published On

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या घरात प्रत्येक आठवड्यात येणारे कॅप्टन्सी टास्क प्रेक्षकांसाठी नेहमीच रोमांचक ठरतात. मात्र यावेळी कॅप्टन्सी टास्कदरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे घरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचं नव्या प्रोमोमधून दिसून आलं आहे. या घटनेमुळे घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांच्याही मनात चिंता निर्माण झाली आहे.

चॅनेलने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये स्पर्धकांना कॅप्टन्सीच्या शर्यतीत स्थान मिळवण्यासाठी दोऱ्यांशी संबंधित एक कठीण टास्क देण्यात आलेला दिसतो. या टास्कमध्ये घरातील सदस्य विविध दोऱ्या खेचत आणि त्यातून स्वतःला मोकळं करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. टास्क जिंकण्यासाठी प्रत्येक स्पर्धक जोरदार प्रयत्न करत असल्याचं दृश्य प्रोमोमध्ये पाहायला मिळतं.

Bigg Boss Marathi
Janki Bodiwala: 'रोज शरीरावर जखमा व्हायच्या...'; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला शूटिंग दरम्यान घडलेला धक्कादायक प्रकार

याचदरम्यान स्पर्धक संकेतही पूर्ण ताकदीने दोऱ्या खेचताना दिसतो. काही क्षणांतच स्पर्धकांमध्ये चुरशीची झुंज सुरू असल्याचं जाणवतं. मात्र पुढच्याच क्षणी परिस्थिती अचानक बदलते.प्रोमोमध्ये संकेत अनेक दोऱ्यांमध्ये अडकलेला दिसतो आणि त्यातून सुटण्याचा प्रयत्न करत असताना घरात एकच गोंधळ उडतो. परिस्थिती गंभीर होत असल्याचं पाहून घरातील सदस्यही घाबरलेले दिसतात.

Bigg Boss Marathi
Youtuber anurag Dobhal: बिग बॉस फेम यूट्युबरने सोशल मीडियावर केली शेवटची पोस्ट; मनोरंजन सृष्टीत खळबळ

त्याच वेळी राखी सावंत घाबरलेल्या आवाजात ओरडताना ऐकू येते, “त्याच्या गळ्यात दोरी अडकली!” तिच्या या ओरडण्यामुळे घरातील इतर सदस्यही चिंतेत पडतात आणि सर्वांचे लक्ष संकेतकडे वळते. परिस्थिती बिघडत असल्याचं लक्षात येताच बिग बॉस तात्काळ हस्तक्षेप करतात. “थांबा… सगळ्यांनी त्वरित थांबा!” असा आदेश देत टास्क लगेच थांबवण्यास सांगितलं जातं. त्यानंतर घरातील सदस्य धाव घेऊन संकेतला दोऱ्यांतून सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आता यामुळे घरात कोणता नवा ड्रामा रंगणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com