

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालंय. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील त्यांच्या घरी नाना पाटेकर यांना कार्डियाक अरेस्ट आला. त्यानंतर तातडीने मेडिकल टीमला बोलावण्यात आलं. मात्र मेडिकल टीम पोहोचेपर्यंत नाना प्रतिसाद देत नव्हते.
यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी जवळपास ४५ मिनिटं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी ५ वाजून २० मिनिटांनी मेडिकल टीमने त्यांना मृत घोषित केलं.
नाना पाटेकर यांच्या निधनाचं प्रकरण मेडिको-लीगल केस (MLC) म्हणून नोंदवण्यात आलं आहे. आज त्यांचं पोस्टमार्टम केलं जाणार आहे. नाना यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनीही त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नाना यांच्या निधनाची बातमी मिळाली, त्यावेळी मल्हार पुण्यात होते. वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच ते गोव्याला रवाना झाले. यावेळी त्यांनी आपल्याकडे सध्या पूर्ण माहिती नसल्याचं सांगितलं.
नाना पाटेकर यांची ओळख केवळ एक उत्तम अभिनेता म्हणून नव्हती. त्यांना क्रिकेटचीही प्रचंड आवड होती. अभिनयासोबतच क्रिकेट हा त्यांच्या आवडीचा विषय होता. २०१५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या लहानपणीच्या क्रिकेटच्या आठवणी सांगितल्या होत्या.
लहानपणी आपण चांगले क्रिकेट खेळायचो असं नाना यांनी त्या मुलाखतीत सांगितलं होतं. ते ऑफ स्पिन गोलंदाजी करायचे. त्या काळात घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे क्रिकेट शिकण्यासाठी पैसे देणं त्यांना शक्य नव्हतं. नाना यांनी सांगितलं होतं की, ते शिवाजी पार्कमध्ये जायचे. तिथे जे लोक नेटमध्ये सराव करायचे, त्यांना ते गोलंदाजी करायचे. अशा प्रकारे त्यांना क्रिकेट खेळता आलं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना असला की, नाना टीव्हीसमोर बसून सामना पाहायचे. क्रिकेटबद्दलच्या प्रेमाबद्दल त्यांनी अनेकदा सांगितलं होतं. इतकंच नाही तर आजही १० दिवस सराव केला तर आपण चांगली गोलंदाजी करू शकतो, असा विश्वास नाना यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या मनात आजही एक क्रिकेटर जिवंत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
वय वाढलं तरी नाना पाटेकर यांचं क्रिकेटवरील प्रेम कमी झालं नाही. त्यांना टीम इंडियातील स्टार फलंदाज विराट कोहली विशेष आवडायचा. एका मुलाखतीत नाना यांनी विराटबद्दल एक मजेशीर किस्साही सांगितला होता. विराट कोहली लवकर आऊट झाला तर त्यांची जेवायलाही इच्छा होत नाही, असं नाना यांनी म्हटलं होतं.
जानेवारी २०२५ मध्ये नाना यांचा हा जुना किस्सा पुन्हा चर्चेत आला होता. विराट कोहली लवकर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी नाना यांच्या या वक्तव्याची आठवण करून देत मजेदार मीम्स शेअर केले होते.
नाना पाटेकर यांनी क्रिकेट आणि सिनेमा यांच्यातील साम्याबद्दलही भाष्य केलं होतं. क्रिकेट आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रांमध्ये एक प्रकारची परीक्षा असते, असं त्यांनी म्हटलं होतं. क्रिकेटपटूचा सामना पाच दिवसांपर्यंत चालतो, तर एखाद्या कलाकाराचं काम दीड ते दोन वर्षांपर्यंत सुरू राहू शकतं. मात्र शेवटी दोन्ही ठिकाणी जनताच निर्णय घेत असते, असं नाना यांनी सांगितलं होतं.
नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीसोबतच त्यांच्या असंख्य चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. दमदार अभिनय, प्रभावी संवादफेक आणि वेगळी अभिनयशैली यामुळे नाना पाटेकर यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र अभिनयासोबतच क्रिकेटवरील त्यांचं प्रेमही कायम चर्चेत राहिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.