समुद्रात छटपूजा नकोच! मनसे आक्रमक, मुंबईत नवा वाद पेटणार?

MNS Opposes Chhath Puja Celebrations At Mumbai Beaches: मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर होणाऱ्या छटपूजेला मनसेने विरोध केला आहे. गणेशोत्सव आणि नवरात्राप्रमाणे छटपूजेसाठीही कृत्रिम तलाव उभारण्याची मागणी कुशल धुरी यांनी केली असून, याबाबत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना निवेदन देण्यात येणार आहे.
MNS OPPOSES CHHATH PUJA AT MUMBAI BEACHES
MNS OPPOSES CHHATH PUJA AT MUMBAI BEACHESsaam tv
Published On: 

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर होणाऱ्या छटपूजेवरून आता राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. समुद्रात छटपूजा करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्षेप घेतला असून, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाप्रमाणेच छटपूजेसाठीही मुंबई महापालिकेने कृत्रिम तलावांची व्यवस्था करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष कुशल धुरी यांनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

MNS OPPOSES CHHATH PUJA AT MUMBAI BEACHES
मालाडमध्ये गरबा महोत्सवासाठी अनोखी अट; गोमूत्र-कुंकवाचा टिळा आणि सनातनी धर्म मान्य असणाऱ्यांनाच प्रवेश

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात समुद्रात मूर्ती विसर्जनावर निर्बंध घालण्यात येतात. पर्यावरण आणि समुद्राचे प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाते. मग छटपूजेच्या वेळी समुद्रकिनाऱ्यांवर धार्मिक विधी करण्यासाठी विशेष सुविधा का पुरवल्या जातात, असा सवाल कुशल धुरी यांनी उपस्थित केला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून मराठी माणसाच्या सण-उत्सवांच्या वेळी विविध नियम आणि निर्बंध लादले जातात. मात्र, इतर राज्यांतील नागरिकांच्या सणांसाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, असा आरोपही धुरी यांनी केला. मराठी सणांसाठी एक नियम आणि इतर सणांसाठी वेगळे नियम का, असा सवाल करत त्यांनी पालिका प्रशासनाच्या धोरणावर टीका केली.

MNS OPPOSES CHHATH PUJA AT MUMBAI BEACHES
मावळमध्ये डंपरच्या धडकेने ग्रामस्थाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचे 'चक्का जाम' आंदोलन

छटपूजा हा धार्मिक श्रद्धेचा विषय असला तरी पर्यावरणाचे रक्षण आणि समुद्राचे प्रदूषण रोखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे समुद्रात छटपूजा करण्याऐवजी गणेशोत्सव आणि नवरात्राप्रमाणे कृत्रिम तलावांची व्यवस्था करावी, अशी मनसेची भूमिका आहे. या मागणीसंदर्भात मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. त्यामुळे छटपूजेच्या आयोजनावरून आगामी काळात मुंबईत मनसे आणि महापालिका प्रशासन यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.