मावळमध्ये डंपरच्या धडकेने ग्रामस्थाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचे 'चक्का जाम' आंदोलन

Villagers block traffic following dumper accident in Maval, Pune : आंबी एमआयडीसी परिसरात डंपरच्या धडकेत एका ग्रामस्थाचा मृत्यू झाल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. या वाढत्या अपघातांच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून 'चक्का जाम' आंदोलन केले आहे.
Villagers block traffic following dumper accident in Maval, Pune
Villagers block traffic following dumper accident in Maval, Punesaam tv
Published On: 

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी

पुणे: मावळच्या आंबी एमआयडीसी परिसरात अवजड डंपरच्या बेदरकार वाहतुकीचा प्रश्न आता थेट नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. स्टोन क्रशरमधून होणारी अनियंत्रित वाहतूक आणि अपघातांच्या वाढत्या मालिकेमुळे स्थानिकांचा रोष अनावर झाला आहे. अखेर एका भीषण अपघातानंतर ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर आला असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

नेमकं काय घडलं?

मंगरूळ येथून नवलाख उंब्रेच्या दिशेने जात असताना शेटेवस्ती परिसरात एका डंपरच्या धडकेत नाथाभाऊ पोटवडे (५६) या ग्रामस्थाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी आंबी एमआयडीसीचा रस्ता रोखून 'चक्का जाम' आंदोलन केले आणि झोपी गेलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Villagers block traffic following dumper accident in Maval, Pune
NCP: मोठी बातमी! राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल, मुंबई अध्यक्षपदी 'या' युवा नेत्याची वर्णी

बैठका आणि आश्वासने कागदावरच?

काही दिवसांपूर्वीच मंगरूळ, निगडे, आंबी आणि नवलाख उंबरे परिसरातील ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला पर्यावरण विभाग, आरटीओ, पोलीस, एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. स्टोन क्रशर व अवजड डंपर वाहतुकीवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र, प्रशासनाच्या निर्देशानंतरही प्रत्यक्षात वाहतूक सुरूच राहिल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. गेल्या बारा वर्षांपासून याप्रकरणी आंदोलने सुरू असूनही प्रश्न सुटत नसल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वसन

वाढत्या तणावानंतर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मोबाईलवरून आंदोलकांशी संवाद साधत कठोर कारवाईचे आश्वासन दिले. तसेच, पुढील चार दिवसांत गावात येऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

Villagers block traffic following dumper accident in Maval, Pune
Gold Rate Today : दिवाळीपूर्वी सोन्याला चकाकी! आज इतक्या रुपयांनी महागलं १ तोळा सोनं ; वाचा 18k, 22k, 24k चे ताजे दर

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर सवाल

हा प्रश्न केवळ एका अपघातापुरता मर्यादित नसून स्टोन क्रशरच्या नियमांची तपासणी, डंपर वाहतुकीवर नियंत्रण आणि नियमभंग करणाऱ्यांवर ठोस कारवाई कधी होणार, असा सवाल विचारला जात आहे. केवळ तहसील कार्यालयातील बैठका आणि आश्वासनांची खैरात नको, तर प्रत्यक्षात रस्त्यावर कारवाई केली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. तसेच, या गंभीर प्रश्नावर स्थानिक खासदार, आमदार आणि जनप्रतिनिधींनी मूग गिळून गप्प बसल्याबद्दल मतदार राजा तीव्र संताप व्यक्त करत आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर प्रशासनाकबून काय ठोस पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण मावळचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com