Gold Rate Today : दिवाळीपूर्वी सोन्याला चकाकी! आज इतक्या रुपयांनी महागलं १ तोळा सोनं ; वाचा 18k, 22k, 24k चे ताजे दर

Gold Silver Rate Today Update News : दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचे दर ६६० रुपयांनी वधारले आहेत. २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे भाव, १० ग्रॅम सोन्याची किंमत आणि चांदीचे दर जाणून घ्या.
Gold Rate Today News
Gold Rate Today News AI Image
Published On: 

दिवाळीचा सण जवळ येताच बाजारपेठांमध्ये सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढू लागली आहे. सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करण्याला विशेष महत्त्व असल्याने अनेक ग्राहकांनी खरेदीचे नियोजन केले आहे. मात्र, दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सध्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाख ४३ हजार ९५० रुपये इतकी झाली आहे. सोन्याच्या दरातील या वाढीचा परिणाम दिवाळीच्या खरेदीवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः लग्नसराई आणि सणासाठी दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना वाढीव दरांचा विचार करून निर्णय घ्यावा लागत आहे. दुसरीकडे, गेल्या अनेक महिन्यांपासून अडीच लाख रुपयांच्या आसपास असलेल्या चांदीच्या दरांमध्येही चढ-उतार दिसून येत आहेत. सध्या चांदीचे दर स्थिर झाल्याचे चित्र असून, १०० ग्रॅम चांदीची किंमत २२ हजार रुपयांवर पोहोचली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरांतील बदलांकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Gold Rate Today News
Morning Headache : सकळी उठल्या उठल्या डोकं दुखतं? असू शकतं 'या' भयंकर आजाराचं संकेत

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,३९५

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१५,१६०

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४३,९५०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,३९,५००

Gold Rate Today News
Health Care : रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किती अंतर असावे?

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,१९५

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०५,५६०

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३१,९५०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,१९,५००

Gold Rate Today News
Weather Update : ‘अर्णब’ चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकलं! महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,७९६

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ८६,३६८

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०७,९६०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,७९,६००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com