Famous Actor : बॉलिवूडमध्ये दहशतीचे वातावरण! टायगर, तुषारनंतर 'या' सुपरस्टारला धमकी; लॉरेन्स गँगच्या नावाने कोट्यवधींची खंडणी

Bollywood Actor Threat : टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याला धमकीचा ऑडिओ मेसेज आला असल्याची माहिती समोर आली आहे. धमकी देणाऱ्याने स्वतःचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा दावा केला आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Bollywood Actor Threat
Famous Actor SAAM TV
Published On: 
Summary

बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्याला धमकीचा मेसेज

कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती

पोलीस सर्व प्रकरणांचा तपास करत आहेत.

साम टीव्ही प्रतिनिधी - साक्षी यादव

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर बॉलिवूड हादरले. त्यानंतर बॉलिवूडमधील कलाकारांना धमक्या मिळण्याचे सत्र सुरूच असून, आता अभिनेता आयुष्मान खुरानालाही धमकीचा ऑडिओ मेसेज मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर आता इतर कलाकारांनाही टार्गेट केले जात असल्याने चित्रपटसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आयुष्मान खुरानाकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष्मान खुरानाला एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ऑडिओ मेसेज पाठवण्यात आला. या ऑडिओमध्ये संबंधित व्यक्तीने स्वतःचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याचा दावा केला आहे. तसेच अभिनेत्याकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचे सांगितले जात आहे. या धमकीच्या मेसेजमुळे सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

धमकी देणाऱ्याच्या आवाजाची पडताळणी सुरू

या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीने ऑडिओ मेसेजमध्ये सांगितलेले नाव आणि पोलीस रेकॉर्डमधील संबंधित आरोपीचा आवाज यांची पडताळणी केली जात आहे. ऑडिओमधील आवाज नेमका कोणाचा आहे आणि संबंधित व्यक्तीचा लॉरेन्स गँगशी खरोखर काही संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Bollywood Actor Threat
Famous Actress : मामाशी लग्न करावं लागलं, वयाने मोठ्या अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध ठेवल्याचा अभिनेत्रीला पश्चात्ताप; उघड केलं इंडस्ट्रीतील 'काळे सत्य'

तुषार कपूरलाही मिळाला होता धमकीचा मेसेज

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता तुषार कपूर यालाही धमकीचा ऑडिओ मेसेज मिळाल्याचे समोर आले होते. या मेसेजमध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख हॅरी बॉक्सर अशी करून दिली होती. मात्र, प्राथमिक तपासादरम्यान तुषार कपूरला पाठवण्यात आलेला ऑडिओ मेसेज बनावट असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.

कलाकारांना धमक्या देणाऱ्यांचा शोध सुरू

अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराची घटना आणि त्यानंतर आयुष्मान खुराना, तुषार कपूर यांना मिळालेल्या धमक्यांमुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कलाकारांना धमक्या देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती किंवा टोळीचा पोलीस शोध घेत आहेत.या सर्व घटनांमागे एकच टोळी आहे का, धमक्या देणारे खरोखरच गँगशी संबंधित आहेत का आणि खंडणी मागण्यामागे नेमका काय उद्देश आहे, याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.