Weather Update: चक्रीवादळाचा धोका! आज सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस, १५ राज्यांना झोडपून काढणार; महाराष्ट्रात कसं राहिल हवामान?

Rain Alert For 15 States: देशातील २५ राज्यात आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Weather Update: चक्रीवादळाचा धोका! आज सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस, १५ राज्यांना झोडपून काढणार; महाराष्ट्रात कसं राहिल हवामान?
Rain News UpdateSaam Tv
Published On: 
  • मुरासू चक्रीवादळाचा धोका वाढला

  • आज १५ राज्यांना पावसाचा इशारा

  • बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा देशभर परिणाम

  • ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहण्याचा हवामान विभागाचा इशारा

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अर्णब चक्रीवादळानंतर आता देशाला मुरासू चक्रीवादळाचा धोका आहे. या चक्रीवादळाचा परिणाम आता देशभरातील अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. चक्रीवादळाचा उर्वरित भाग आता पूर्व तेलंगणा आणि लगतच्या किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशवर कमी दाबाच्या क्षेत्रात आहे. याचा परिणाम केवळ दक्षिण भारतापुरता मर्यादित राहणार नाही तर देशातील १५ राज्यांना या चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. आज या राज्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेशसह १५ राज्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ७० किलोमीटरपर्यंत असू शकतो. दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि छत्तीसगडमध्येही हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील जोरादर पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. आज अनेक राज्यांमध्ये तापमानही कमी होऊ शकते.

Weather Update: चक्रीवादळाचा धोका! आज सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस, १५ राज्यांना झोडपून काढणार; महाराष्ट्रात कसं राहिल हवामान?
Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज डोंगराळ राज्यांमध्ये पावसासोबत हिमवृष्टी देखील होऊ शकतो. काही भागांमध्ये भूस्खलनाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. पूर्व भारतातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. बंगालच्या उपसागरातील जोरदार वाऱ्यांचा परिणाम पूर्वेकडील राज्यांमधील हवामानावरही होण्याचा अंदाज आहे. पुढीच्या ३ दिवसांत उत्तर भारतातील तापमानात बदल होईल. १० पेक्षा जास्त राज्यांमध्ये पारा ४ ते ५ अंशांनी खाली येऊ शकतो.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात आलेल्या मुरासू चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली. आज राज्यात ढगाळ हवामान राहिल. त्याचसोबत अनेक भागांमध्ये तापमानात चढ-उतार कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Weather Update: चक्रीवादळाचा धोका! आज सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस, १५ राज्यांना झोडपून काढणार; महाराष्ट्रात कसं राहिल हवामान?
Maharashtra Rain Alert: पुणे, सोलापूरसह १० जिल्ह्यांत तुफान पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.