

केंद्र सरकारने मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 5 कोटीहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडण्यात आली असून 3 लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. या योजनेत २५० रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे या योजनेवर आकर्षक व्याजदर दिला जातो. त्यामुळे दीर्घकालीन बचतीवर चांगला परतावा मिळतो.
सरकारच्या या अल्पबचत योजनेत पालक त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार गुंतवणूक करू शकतात. दरमहा १,०००, २,०००, ३,०००, ४,०००, ५,००० किंवा त्याहून अधिक रक्कम गुंतवू शकतात; तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल, तितका मोठा निधी तुमच्या मुलीसाठी तयार होईल.
'सुकन्या समृद्धी योजना'चा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत. ही योजना केवळ मुलींसाठीच आहे. पालक जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावे 'सुकन्या समृद्धी योजना' अंतर्गत खाते उघडू शकतात. मुलीचे वय १० वर्षांपेक्षा जास्त नसावे. मुलीच्या जन्मानंतर लगेच खाते उघडल्यास, ती २१ वर्षांची होईपर्यंत एक मोठी रक्कम जमा होऊ शकते.
या योजनेत केवळ १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते, तर योजनेचा कालावधी २१ वर्षांचा असतो. याचा अर्थ असा की, जर मुलीच्या जन्मानंतर लगेच खाते उघडले, तर ती २१ वर्षांची होईपर्यंत एक मोठी रक्कम जमा होऊ शकते. ही रक्कम तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरता येते.
'सुकन्या समृद्धी योजने'अंतर्गत, दरमहा २,००० रुपयांचे योगदान देऊन योजनेच्या मुदतपूर्तीपर्यंत एक मोठा निधी जमा करता येतो. दरमहा २,००० रुपयांची गुंतवणूक म्हणजेच वार्षिक २४,००० रुपयांची गुंतवणूक मुलीसाठी ११,०८,४१२ रुपयांचा निधी तयार होऊ शकतो. या परिस्थितीत, तुमची एकूण गुंतवणूक ३,६०,००० रुपये असेल आणि तुम्हाला व्याजापोटी ७,४८,४१२ रुपये मिळतील.
'सुकन्या समृद्धी योजना' ८.२% इतका व्याजदर देते, जो सर्व अल्प बचत योजनांमध्ये सर्वाधिक आहे. या योजनेत जमा केलेले पैसे मुलगी १८ वर्षांची झाल्यावर किंवा तिने इयत्ता १० वी पूर्ण केल्यावर, जमा रकमेपैकी निम्मी रक्कम काढता येते. याव्यतिरिक्त, जर मुलीचे लग्न १८ वर्षांनंतर होत असेल, तर ही योजना तिच्या नियोजित मुदतपूर्तीपूर्वी बंद करता येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.