Maharashtra CM Devendra Fadnavis saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पंढरपुरमध्ये CM फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक, ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर

Maharashtra CM Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पढंरपूरमध्ये मास्टरस्ट्रोक दिला आहे. पंढरपुरातील ऑपरेशन लोटसला यश आले. ४ माजी आमदार भापच्या वाटेवर आहेत. लवकरच ते पक्षप्रवेश करणार आहेत.

Priya More

Summary -

  • पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक

  • सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर

  • माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, यशवंत माने, बबन शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सोलापुरमध्ये भाजपची ताकद वाढली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू आहे. भाजपमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालल्यामुळे राज्यात भाजपची ताकद वाढत चालली आहे. सोलापुरमधील बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पंढरपुरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मास्टरस्ट्रोक दिला आहे. ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, यशवंत माने आणि बबन शिंदे यांची नावे समोर आली आहेत. या चौघांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

माढयाचे माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे, माजी सभापती विक्रम शिंदे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हे सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भाजपमध्ये जम्बो पक्षप्रवेश झाला. सोलापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधून दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा पक्ष प्रवेश झाला. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीपूर्वी सोलापुरमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT