भारत कोकाटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला
ठाकरे गटात काम करण्याची संधी मिळाली नसल्याचं भारत कोकाटे म्हणाले.
नाशिकमधील भाजपची ही चाल स्थानिक राजकारणात मोठे बदल घडवू शकते.
भाजपने देवाची भूमी असलेल्या शहरात म्हणजेच नाशिकमध्ये मोठा खेळ खेळलाय. एका राजकीय घरात फूट पाडलीय. भारत कोकाटे यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश केला आहे. भारत कोकाटे हे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू आहेत. भारत कोकटे यांच्या भाजप प्रवेशामुळे माणिकराव कोकाटे यांना मोठा राजकीय धक्का बसलाय.
भारत कोकाटे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत होते. भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर भारत कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिलीय. ठाकरे गटात असताना आपल्याला काम करत आले नसल्याचं सांगितलं. त्यामुळे ते ठाकरे गटात नाराज होते. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकाटे यांचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जातोय. सिन्नर आणि नाशिकच्या राजकारणात याचा प्रभाव पडतो.
राजकीय जीवनात काम करताना स्वतःला काय मिळेल यापेक्षा कार्यकर्त्यांना काय देऊ शकतो हे महत्त्वाचे असते. मी ४ वर्षांपासून कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकलो नाही. ठाकरे गटात प्रवेश केला तेव्हा मला काम करता आले नाही", अशी खंत त्यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केली.
मला आता पंतप्रधान मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल. फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम करतात, तोच आदर्श मी घेतलाय. त्यासाठीच मी पक्षात प्रवेश केला. छोट्या-छोट्या समस्या असतात, त्या सोडवायच्या आहेत. रेशन कार्ड आणि इतर समस्या असतात. पक्षाचा कोणताही आदेश मान्य असेल, अशी प्रतिक्रिया भारत कोकाटे यांनी दिलीय. मी कुणावरही नाराज नाहीये. माझे बंधू आणि माझ्यामध्ये राजकीय मतभेद आहेत. पण कौटुंबिक कलह नाही," असे त्यांनी बंधू माणिकराव कोकाटे यांच्याविषयी मत मांडलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.