Maharashtra Politics: साताऱ्यात अजितदादांनी खेळला राजकीय डाव; भाजपला झटका,महत्त्वाचा नेता फोडला

Satara Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी साताऱ्यात भाजपला मोठा धक्का दिलाय. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी भाजपला रामराम ठोकलाय. या पक्षांतरामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलली आहेत.
Satara Politics
Ajit Pawar welcomes former BJP leader Vikrambaba Patankar into NCP during a key political event in Satara.saam tv
Published On
Summary
  • अजित पवार यांनी साताऱ्यात भाजपला मोठा धक्का दिला.

  • भाजप नेते विक्रमबाबा पाटणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा डाव महत्त्वाचा ठरेल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच झालीय. स्थानिक राजकारणाला वेग आला आहे. जो तोपक्ष स्थानिक नेत्यांना आपल्या गोटात ओढत आपली ताकत वाढवत आहे. दौडनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने साताऱ्यात राजकीय डाव टाकत भाजपला मोठा धक्का दिला आहे.

Satara Politics
Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

महाविकास आघाडीचे नेते मतदान यादीतील घोळाच्या मुद्द्यावर जोर देत आहे. दुसरीकडे महायुतीचे नेते हे निवडणुकीच्या दृष्टीने एकमेकांचे नेते फोडत आहेत. भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी नगरसेवक फोडले. तर शिंदेंनी काँग्रेसला धक्के दिले. आता राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला मोठा धक्का दिलाय.

Satara Politics
Uddhav and Raj Thackeray: आयोगाविरोधातील लढाईत ठाकरेच केंद्रस्थानी; दिवाळीआधीच युतीचा बार उडण्याची शक्यता?

पाटण तालुक्यातील भाजप नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांना आपल्या गोटात ओढत तेथील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. पाटण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जातोय.

Satara Politics
Mahayuti Politics: अजित पवारांचा भाजपला 'दे धक्का'! डाव पलटवणारा नेता फोडला, शहा यांचा पक्षाला रामराम

सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सत्यजितसिंह पाटणकरांच्या भाजप प्रवेशानंतर विक्रमबाबा पाटणकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. या राजकारणातील उलथापालथमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत पाटणमध्ये रंगत वाढण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विक्रमबाबा पाटणकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com