Mahayuti Politics: अजित पवारांचा भाजपला 'दे धक्का'! डाव पलटवणारा नेता फोडला, शहा यांचा पक्षाला रामराम

Western Maharashtra Politics: पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेते स्वप्नील शहा यांना पक्षात घेत अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवलाय. यामुळे भाजप आमदार राहुल कुल यांच्यासह भाजपला मोठा धक्का बसला आहे.
Western Maharashtra Politics
Ajit Pawar delivers a major political shock to BJP as Swapnil Shah quits the party and joins his camp in Pune district.saam tv
Published On
Summary
  • अजित पवार यांनी भाजपचा नेता स्वप्नील शहा यांना फोडून आपल्या गटात घेतलं आहे.

  • दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना यामुळे मोठा राजकीय धक्का बसला.

  • काही दिवसांपूर्वी माजी आमदार रमेश थोरात यांचा पक्ष प्रवेश करून घेतला होता.

भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद वाढत आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी पक्षाची मोर्चेबांधणी करत भाजप अनेकांना पक्षाशी जोडत आहे. यादरम्यान अजित पवार यांनी भाजपला पुणे जिल्ह्यात धक्का दिलाय. ऐनवेळी बाजी पलटवणाऱ्या नेत्यालाच अजित पवार गटाने भाजपातून फोडलाय. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढणाऱ्या भाजपला मोठा धक्का दिला आहे.

Western Maharashtra Politics
Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; माजी IPS आणि प्रसिद्ध गायिकेसहित कुणाला मिळाली संधी?

अजित पवार यांच्या खेळीमुळे दौंडचे आमदार राहुल कुल यांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात मोठा राजकीय धक्का बसलाय. काही दिवसांपूर्वी माजी आमदार रमेश थोरात यांचा पक्षात प्रवेश करून घेतला होता. आता स्वप्नील शहा यांना भाजपमधून फोडून राहुल कुल यांना दुसरा मोठा धक्का दिला.

Western Maharashtra Politics
Gadchiroli Naxalites: मोठी बातमी! साडेपाच कोटींचं बक्षीस असलेल्या भूपतीसह ६१ नक्षलवाद्यांचं सशस्र आत्मसमर्पण

येत्या १७ ऑक्टोबर रोजी दौंड शहर आणि तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. याबाबत माजी भाजप (BJP) शहराध्यक्ष स्वप्नील शहा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शहा यांनी काही दिवसापूर्वीच भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. स्वप्नील शहा यांच्या राजीनाम्याने दौंडमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.

दरम्यान राजीनामा दिल्यानंतर आणि राष्ट्रवादीत प्रवेश करणाचे निश्चित केल्यानंतर स्वप्नील शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपमधील एकतर्फी आणि मनमानी कारभारामुळे नवीन राजकीय मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला. मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो, पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्पित कार्यकर्ता म्हणून काम करेन, अशी प्रतिक्रिया स्वप्नील शहा यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com