Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; माजी IPS आणि प्रसिद्ध गायिकेसहित कुणाला मिळाली संधी?

Bihar Election update : बिहार निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीये. माजी IPS आणि प्रसिद्ध गायिकेसहित १२ उमेदवारांचा दुसऱ्या यादीत समावेश आहे.
maharashtra Politics
bjp Saam tv
Published On
Summary

बिहार विधानसभा निवडणूक 2025 साठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

भाजपच्या दुसऱ्या यादीत 12 उमेदवारांच्या नावांचा समावेश

मैथिली ठाकूर यांना अलीनगर, तर माजी IPS आनंद मिश्रा यांना बक्सरमधून तिकीट.

छपरा, गोपालगंज, सोनपूरसह प्रमुख मतदारसंघांत ठरले भाजपचे उमेदवार

Bihar Election update : बिहार निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत भाजपच्या १२ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत दोन प्रमुख नावांचा समावेश असल्याचं पाहायला मिळालं.

दुसऱ्या यादीत गायिका मैथिली ठाकूर यांना अलीनगर आणि माजी पोलीस अधिकारी आनंद मिश्रा यांना बक्सर येथून उमेदवारी मिळाली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी यांनी १२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर छोटी कुमारी यांना छपरा येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

राम चंद्र प्रसाद यांना हायाघाट, रंजन कुमार यांना मुजप्फरपूर, सुभाष सिंह यांना गोपालगंज, केदारनाथ सिंह यांना बनियापूर तिकीट मिळालं आहे. विनय कुमार सिंह यांना सोनपूर, वीरेंद्र कुमार यांना रोसडा डा. सियाराम सिंह यांना बाढ, महेश पासवान यांना अगिआंव, राकेश ओझा यांना शाहपूर, माजी आयपीएस आनंद मिश्रा यांना बक्सर येथून उमेदवारी मिळाली आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत ७१ उमेदवारांचा समावेश होता. तर दुसऱ्या यादीत १२ उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने एकूण ८३ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने मैथिली यांना अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अलीनगर विधानसभा मतदारसंघ महत्वाचा मानला जातो. दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघ महत्वाचा मानला जातो. सर्वसाधारण गटासाठी हा मतदारसंघ आहे. २००८ सालानंतर या मतदारसंघ अस्तित्वात आला.

maharashtra Politics
Mumbai : गुणरत्न सदावर्ते आणि शिंदे गटात जोरदार राडा; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

२०२० च्या निवडणुकीत व्हीआयपीच्या मिश्री लाल यादव यांनी आरजेडी यांच्या विनोद मिश्रा यांचा पराभव केला होता. मिश्री लाल यांना ६१०८२ मते मिळाले होते. तर विनोद मिश्रा हे ५७९८१ मते मिळाली होती. या व्यतिरिक्त २०१० आणि २०१५ निवडणुकीत आरजेडीने जिंकल्या होत्या. अब्दुल बारी सिद्दीकी यांनी दोन वेळा निवडणूक जिंकली होती. या मतदारसंघात २०१० साली पहिल्यांदा निवडणूक झाली होती.

maharashtra Politics
Kalyan : खिशातून १,५०,००० रुपयांचा मोबाइल गायब; पठ्ठ्याने बस थांबवून घेतली प्रवाशांची झडती, कल्याणमधील घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com