Maharashtra Politics: एकामागोमाग एक पक्ष नेत्यांचे राजीनामे; मतदारसंघातच आमदार रोहित पवारांविरोधात नाराजीचा सूर?

Karjat-Jamkhed Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर पक्षातील सदस्ये नाराज असल्याचं चित्र दिसत आहे. कर्जत-जामखेडमध्ये मोठी राजकीय फूट निर्माण झाली आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह तीव्र झालाय.
Karjat-Jamkhed Politics
Rohit Pawar faces political backlash as NCP leaders, including district president Rajendra Phalke, tender resignations in Ahmednagar.saam tv
Published On
Summary
  • कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवारांविरोधात नाराजी वाढल्याचे चित्र आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी राजीनामा दिलाय.

  • या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सुशील थोरात , साम प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर नाराज होऊन याआधीही अनेक जण पक्ष बाहेर पडले आहेत. नुकताच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्ज जामखेड मधील नाराजांची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. गेल्या सात वर्षांपासून जिल्हाध्यक्षाची धुरा संभाळताना फाळके यांनी बऱ्याच निवडणुकीमध्ये यश मिळवले होते.

Karjat-Jamkhed Politics
Maharashtra Politics: साताऱ्यात अजितदादांनी खेळला राजकीय डाव; भाजपला झटका,महत्त्वाचा नेता फोडला

मात्र आमदार रोहित पवार आणि राजेंद्र फाळके यांची तार शेवटपर्यंत जोडीच नाही कर्ज जामखेड मधील अनेक कार्यक्रमांना जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवत होती. कर्जत येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक मधुकर राळेभात यांनीही मध्यंतरी रोहित पवार यांच्या हुकूमशाही कारभाराच्या विरोधात बंद करून पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती त्यावेळी सुद्धा त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका करत हा पक्ष आमदार रोहित पवारांची हुकुमशाही पक्ष असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितले होते.

Karjat-Jamkhed Politics
Donald Trump: तात्याचं आधार कार्ड बनलं; भरपत्रकार परिषदेत रोहित पवारांनी बनवलं कार्ड

त्यानंतर कर्जत महानगरपालिकेत सुद्धा मोठी घडामोडी होत आहे. कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या हातातून जाऊन ते भाजपच्या पाठिंब्याने काँग्रेसच्या ताब्यात गेली होती त्यावेळी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमत असूनही नाराज झालेल्या नगरसेवकांनी थेट भाजपला बरोबर घेत काँग्रेसचा नगराध्यक्ष केला होता तर जामखेड आणि कर्जत तालुक्यातील अनेक मोठ्या ग्रामपंचायत सदस्य आमदार रोहित पवार यांच्या मन मानेला कंटाळून त्यांनी राम शिंदे यांच्यासोबत भाजप बरोबर जाण्याची भूमिका घेतली होती.

आतापर्यंत अनेक धक्के शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेसला बसत असताना राजेंद्र फाळके यांच्या रूपाने मोठा धक्का पक्षाला बसला आहे आजपर्यंत राजकीय प्रवाहात राजेंद्र फाळके यांनी पक्षासाठी मोठे काम केले होते पक्षातील बंडा नंतरही ते शरद पवार यांच्याबरोबर एकनिष्ठ राहिले होते खासदार निलेश लंके यांना निवडून आणण्यात राजेंद्र फाळके यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता अजून कोण कोण नाराज पक्षातून बाहेर पडणार हे येणारा काळच ठरवेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com