Uttam Jankar  Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Politics: उत्तम जानकरांना मोठा धक्का, माळशिरसमध्ये भाजप अन् आणखी एका पक्षाकडून तगडे आव्हान

Priya More

भारत नागणे, पंढरपूर

राखीव असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि इच्छुक उमेदवार उत्तम जानकर यांना मोठा धक्का बसला आहे. अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समितीने माळशिरस विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समितीच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

माळशिरस येथे अनुसूचित जाती जमातीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये अनुसूचित जाती हक्क संरक्षण‌ कृती समितीच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव‌‌ आहे. याठिकाणी खऱ्या अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांला महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी अशी‌ मागणी ही या बैठकीत करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेल्या उत्तम जानकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आले आहेत. मोहिते पाटील यांनी उत्तम जानकर यांना महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे उत्तम जानकर हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीचे उत्तम जानकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे अनुसूचित जातीचे सर्टिफिकेट आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रमुख पदाधिकार्यांनी उत्तम जानकरांच्या उमेदवारीला विरोध करत मुळ अनुसूचित जातीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांला उमेदवारी द्यावी अशी मागणी या मेळाव्यात केली आहे.


अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समितीने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे महाविकास आघाडी बरोबरच भाजपाला‌ देखील आता‌ माळशिरसमध्ये उमेदवारी देताना विचार करावा लागणार आहे. माळशिरसमध्ये अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समितीने निवडणूक लढवण्याबाबत घेतलेल्या निर्णयाळे माळशिरसमधील राजकीय चित्रच बलले आहे. या निवडणुकीमध्ये नंमकं काय होतंय हे पाहणं महत्वाचे राहिल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati News : दर्यापुरात रण पेटलं; नवनीत राणा-अडसूळ यांच्यात जोरदार जुंपली

Maharashtra Politics : रश्मी शुक्लांची मुदतवाढ सत्ताधाऱ्यांना फायदेशीर, त्यांना पदावरून हटवा'; कुणी केली मागणी? वाचा

Marathi News Live Updates : मविआची जागा वाटपाची बैठक सुरू

Hardik Pandya: हार्दिक पंड्या बनला टीम इंडियाचा नवा फिनिशर! धोनी अन् विराटलाही सोडलं मागे

Pure Ghee: शुद्ध तूप कसं ओळखायचं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT