खळबळजनक! राज्यातील १० हून अधिक शहरांमध्ये पासपोर्ट आणि पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवण्याची धमकी

Bomb Threat Email To Passport Offices In Rajasthan: राजस्थानमधील १० हून अधिक शहरांमध्ये पासपोर्ट कार्यालये आणि पोस्ट ऑफिसना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली.
Security personnel and police teams conduct checks after bomb threat emails triggered evacuations at passport offices and post offices across several cities in Rajasthan.
Security personnel and police teams conduct checks after bomb threat emails triggered evacuations at passport offices and post offices across several cities in Rajasthan.Saam Tv
Published On

जयपूर: मंगळवारी राजस्थानमधील १० हून अधिक शहरातील पासपोर्ट कार्यालये आणि पोस्ट ऑफिसे बॉम्बने उडवण्याच्या धमकी आल्याने मोठी खळबळ उडाली. राज्यातील १० हून अधिक सरकारी कार्यालयांना एकाच वेळी बॉम्बने उडवण्याच्या धमकी आल्याने पोलीस आणि स्थानिक प्रशासन देखील हादरले. ही माहिती मिळताच, पोलिस आणि सुरक्षा एजन्सींनी घटनास्थळी अतिरिक्त फोर्स तैनात करत परिसर रिकामा केला, आणि तपास सुरू केला. पत्रिका या वृत्तानुसार, मंगळवारी बांसवाडा, सीकर, जोधपूर आणि जैसलमेर येथील पासपोर्ट कार्यालयांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या

दरम्यान, अजमेर, बिकानेर, डुंगरपूर, झुंझुनू, सवाई माधोपूर, भरतपूर आणि दौसा येथील पोस्ट ऑफिसना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या. हे धमकीचे मेसेज ईमेलद्वारे पाठवण्यात आले. तसेच राजधानी जयपूरसह अलवर, सवाई माधोपूर आणि हनुमानगड येथील सरकारी कार्यालयांनाही धमकीचे ईमेल आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसर रिकामा

या धमकीच्या ईमेलची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. स्थानिक पोलिस स्टेशनला तात्काळ सतर्क करण्यात आले. माहिती मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सर्व ठिकाणी पोहोचल्या. खबरदारी म्हणून, परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर कसून तपासणी करण्यात आली. मात्र कुठेही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत.

पाकिस्तानमधून धमकीचा मेल अलवरमध्ये आला

अलवर शहरातील मोती डुंगरी येथील मुख्य पोस्ट ऑफिसला बॉम्बची धमकी मिळाली आहे. ही पोस्ट पाकिस्तानमधून आल्याचे वृत्त आहे. संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे आणि बॉम्ब निकामी करणारे पथक तपास करत आहे. मुख्य गेट बंद करण्यात आले आहे. संपूर्ण तपासणीनंतरच कर्मचारी आणि लोकांना प्रवेश दिला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com