Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी भाजपला मोठं खिंडार; देवेंद्र फडणवीसांचा विश्वासू नेता आज 'तुतारी' फुंकणार

Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठं खिंडार पडणार आहे. कारण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आज शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
Maharashtra Political News
Maharashtra Political NewsSaam TV
Published On

लोकसभेत सर्वाधिक स्ट्राइक रेटने विजय मिळवल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाचा चांगलाच दरारा वाढला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही याच स्ट्राइक रेटने राष्ट्रवादीला विजय मिळण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात येताच अनेक नेते तुतारी फुंकण्यास इच्छुक आहे. विशेष बाब म्हणजे, यामध्ये भाजपमधील सर्वाधिक नेत्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता.

Maharashtra Political News
Maharashtra Politics : राजकीय वारं उलटं फिरलं, शिंदे गटातून आउटगोईंग सुरु, कट्टर शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतणार

त्यामुळे कागलमध्ये भाजपला मोठा फटका बसला. आता इंदारपूर विधानसभा मतदारसंघातही भाजपला खिंडार पडणार आहे. कारण, देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह बडे नेते उपस्थित राहणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांची इंदापूरमध्ये मोठी ताकद आहे. त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपला मोठं खिंडार पडणार आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात अपक्ष उमेदवार म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राज्यात आघाडीचे सरकार सत्तेत असताना हर्षवर्धन पाटील यांनी मंत्रीपद देखील भूषवलं. मात्र, २०१४ आणि २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.

Maharashtra Political News
Maharashtra Politics : विधानसभेआधी शिंदे गटाला मोठा धक्का, बडा नेता लवकरच शिवबंधन बांधणार? ठाकरेंची ताकद वाढणार!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com