Supreme Court : मोठा निर्णय! अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता, राज्य सरकारला अधिकार

Supreme Court allows sub-classification of SC ST for reservation: अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. या निर्णयाने एससी-एसटी आरक्षणामध्ये राज्यांना उप-वर्गीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Supreme Court: ब्रेकिंग! अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास  मान्यता, सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
Supreme CourtSaam TV
Published On

दिल्ली, ता. १ ऑगस्ट २०२४

अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींनी ६ विरुद्ध १ अशा बहुमताने हा सर्वात मोठा निकाल दिला असून राज्य सरकारला वर्गीकरण करता येणार आहे.

Supreme Court: ब्रेकिंग! अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास  मान्यता, सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
Pune Dam Water Level: पुणेकरांना मोठा दिलासा! जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत लक्षणीय वाढ; वाचा नवी आकडेवारी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून या निर्णयाने एससी-एसटी आरक्षणामध्ये राज्यांना उप-वर्गीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

एससी-एसटी आरक्षणामध्ये राज्यांना उप-वर्गीकरण करण्याची परवानगी देता येईल का ? यावर सर्वोच्च न्यायालयाचे 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली होती. फेब्रुवारी महिन्यात कोर्टाने हा निकाल राखून ठेवला होता. आज याबाबत कोर्टाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा निकाल देत वर्गीकरणास मान्यता दिली आहे.

Supreme Court: ब्रेकिंग! अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास  मान्यता, सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
Maharashtra Politics: बंडखोरांना काँग्रेसचा दणका! शहराध्यक्ष, उपाध्यक्षांसह ६ पदाधिकाऱ्यांचे निलंबन; लोकसभेत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

दरम्यान, भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती बीआर गवई, विक्रम नाथ, बेला एम त्रिवेदी, पंकज मिथल, मनोज मिश्रा आणि सतीश चंद्र शर्मा या न्यायाधीशांचा समावेश या पिठात होता. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी वगळता बाकी सर्व न्यायमूर्तींच्या बहुमताने कोर्टाने हा निकाल दिला

Supreme Court: ब्रेकिंग! अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास  मान्यता, सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल
Devendra Fadnavis News: राज्याच्या राजकारणात नवा ट्वीस्ट! देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत मोठी जबाबदारी; भाजप अध्यक्षपदी वर्णी लागणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com