अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे
पुणेकरांसाठी पाणीसाठ्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. जून महिन्यापासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यात देखील चांगला पाऊस झाल्याचं पाहायला मिळतंय. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणीबाणीपासून चांगलाच दिलासा मिळाला आहे. कारण पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांत ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
पुण्यातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती काय?
पुणे जिल्ह्याला पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणांतून पाणीपुरवठा (Pune News) होतो. या तिन्ही धरणांत सध्या पाणीसाठा ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणात सध्या ७५ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात या चारही धरणांत ७९.६६ टक्के इतका पाणीसाठा होता. यावर्षी याच काळात चारही धरणांत मिळून ८९.८७ टक्के इतका पाणीसाठा (Panshet Varasgaon Temghar Dam) आहे.
धरणातील पाणीसाठा खालीलप्रमाणे :
खडकवासला धरणामध्ये सध्या ७५.९० टक्के पाणीसाठा ( Pune Water Storage) आहे. पानशेत धरणात ९१.०१ टक्के पाणीसाठा आहे. वरसगाव धरणात ९०.३६ टक्के, तर टेमघर धरणात ९२.४० टक्के पाणीसाठा आहे. महाराष्ट्रात जुलैमध्ये सरासरीपेक्षा १३८ टक्के जास्त पाऊस पडला, तर पुण्यात सरासरीपेक्षा ३८ टक्के जास्त पाऊस झालाय. पुण्यात पुढील २ ते ३ दिवसांच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
अतिवृष्टीचा अंदाज
जुलैच्या अखेरीस पावसाने थोडासा दिलासा दिल्यानंतर, आता हवामान खात्याने या भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवत अलर्ट जारी केलाय. गेल्या आठवड्यात पुण्यात जोरदार पाऊस झाला (Pune Rain) होता. ज्यामुळे सखल भागात पाणी साचलं होतं, तर सिंहगडाच्या आसपासच्या निवासी संकुलांमध्ये पूर आला होता. ताज्या अपडेटनुसार, पुढील ४ ते ५ दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.