Maharashtra Government Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपनंतर राष्ट्रवादीकडून आरोपीला उमेदवारी, तुरूंगातून लढवणार नगराध्यपदाची निवडणूक

Local Body Election: भाजपनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आरोपीला उमेदवारी देण्यात आली आहे. हा उमेदवार तुरूंगामधून नरगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Priya More

Summary -

  • चिखली नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मोठी राजकीय घडामोड घडली

  • भाजपनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आरोपीला उमेदवारी

  • नगराध्यक्षपदाची निवडणूक आरोपी लढवणार

  • पोलिस संरक्षणात उमेदवारी अर्ज दाखल

संजय जाधव, बुलडाणा

भाजपनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही एका आरोपीला उमेदवारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. बुलडाण्याच्या चिखलीत राष्ट्रवादीकडून विशाल उर्फ रिकी काकडेने उमेदवारी अर्ज भरला. विशालवर पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिस बंदोबस्तात त्याने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे युवा शहर अध्यक्ष असलेल्या रिकी काकडेला काँग्रेसनं उमेदवारी नाकारली होती. चिखली नगर परिषद निवडणूकीतील या धक्कादायक प्रकाराची सध्या चर्चा होत आहे.

९ नोव्हेंबर रोजी चिखली शहरात चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या विशाल उर्फ रिकी काकडेचे अनैतिक संबंधाच्या संशयावरून आणि कौटुंबिक कलहातून पत्नी नमिता काकडे यांच्यासोबत वाद झाला. या वादादरम्यान विशालने पत्नीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी चिखली शहर पोलिस ठाण्यात विशाल काकडे विरुद्ध ९ नोव्हेंबर रोजी पत्नी नमिता काकडेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर विशाल काकडे हा न्यायालयीन कोठडीत आहे.

गुन्हेगार असताना विशाल काकडेने न्यायालयाच्या परवानगीने नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग १३ अ मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल काकडेने न्यायालयीन कोठडीत असताना पोलिस संरक्षणात येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चिखली शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा चिखली शहर युवा अध्यक्ष असलेल्या विशाल काकडेला काँग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यानंतर विशाल काकडेने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चिखली शहरात खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmendra Health Update: ८९ वर्षीय धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? ८ दिवसांनी आली हेल्थ अपडेट

8th Pay Commission: १ कोटी कर्मचाऱ्यांना बसणार फटका; महागाई भत्ता, HRA आणि ट्रॅवल अलाउंस होणार बंद? नेमकं कारण काय?

Daily mistakes: तुमच्या दररोजच्या ५ चुका हार्ट अटॅक येण्यासाठी ठरतायत कारणीभूत; वेळीच व्हा सावध

Saif Ali Khan : बॉलिवूडच्या 'नवाब'चा थाटच न्यारा; मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, आकडा पाहून फिरतील डोळे

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज पुन्हा उभारणार- मंत्री उदय सामंत

SCROLL FOR NEXT