Maharashtra Politics: जे पेरलं त्याची फळं मिळत आहेत, ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंवर घणाघात

uddhav Thackeray Slams eknath Shinde: महायुतीमध्ये वादाची ठिणगी उडाली आहे. शिंदे गट भाजपवर नाराज झाला आहे. महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून यावर आता शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्यावर टीका केली आहे.
Maharashtra Politics: जे पेरलं त्याची फळं त्यांना मिळत आहेत, ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंवर घणाघात
uddhav Thackeray Slams eknath ShindeSaam tv
Published On

Summary -

  • महायुतीमध्ये भाजप–शिंदे गटात निवडणूक काळात तणाव वाढला

  • सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर घणाघात केला

  • जे पेरलं त्याची फळं मिळतात, असे म्हणत शिंदेंना टोला लगावला

  • दिल्लीतील भेटी, मंत्रिमंडळ बहिष्कार आणि भाजपच्या पद्धतीवरही सवाल उपस्थित

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीमध्ये महायुतीमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये कोल्डवॉर सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान महायुतीमध्ये वादाची ठिणगी उडाली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनाच नाही तर आपल्या मित्रपक्षातील नेत्यांनाही पक्षामध्ये घेऊन महाराष्ट्रात आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू असल्यामुळे महायुतीमधील तणाव वाढत चालला आहे. याच वादावर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून महायुतीवर निशाणा साधण्यात आला आहे. मिंधे मंडळ नाराज झाले म्हणे असे म्हणत सामनातून शिंदेगटाला डिवचण्यात आले आहे.

सामनाच्या अग्रलेखामध्ये महायुतीमधील नाराजीनाट्यावर भाष्य करत निशाणा साधण्यात आला आहे. त्यात असे म्हटले आहे की, 'भाजपने तुम्हाला फोडले तेव्हा आनंदाने आणि सत्तालोभाने स्वतःला फोडून घेतले. आता भाजप तुमच्याही गटाचे लचके तोडतोय म्हटल्यावर बोंब मारून काय होणार? तुमच्या नाराजीची धुळवड बिनरंगाची आहे आणि प्रत्येक वेळी ही धूळ जशी उडते तशीच खाली बसते. भाजपवाल्यांच्या डोळ्यांत जराही जात नाही. तुम्ही सत्तेत जरूर आहात, पण भाजपवाले ना तुम्हाला ‘राजी’ करण्याचे कष्ट घेतात ना तुमच्या ‘नाराजी’ला भीक घालतात. मिंधे गटाने जे पेरले त्याची फळे त्यांना मिळत आहेत. त्यामुळे ‘भोगा आपल्या कर्माची फळे’ इतकेच आम्ही सांगू शकतो.'

Maharashtra Politics: जे पेरलं त्याची फळं त्यांना मिळत आहेत, ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंवर घणाघात
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; पुण्यात शरद पवार गटाच्या उमेदवाराला बेदम मारहाण

एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवर देखील सामनातून टीका करण्यात आली. या दिल्लीवारीचा खरपूस समाचार घेण्यात आलाय. 'महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मिंधे गटास चणे-फुटाण्याइतकीही किंमत नाही. तरी हे चणे-फुटाणे या ना त्या विषयावर तडतडत असतात. ‘आम्ही नाराज आहोत बरे’ असे मुंबईत बोलायचे आणि दिल्लीत जाऊन अमित शहांचे चरण धुवायचे अशा या मिंधे गटाचा म्हणे मंगळवारी नाराजीचा स्फोट झाला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्याची हिंमत या लोकांत खरंच आहे काय?' असा सवाल करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: जे पेरलं त्याची फळं त्यांना मिळत आहेत, ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंवर घणाघात
Mumbai Politics : मुंबईत निवडणुकीआधीच वादाचा बॉम्ब फुटला; ठाकरेंचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले, नेमकं काय घडलं?

तसंच, 'मिंधे यांच्या पक्षाचे लोक भाजपवाले फोडत आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपवाल्यांकडून ‘ऑपरेशन लोटस’ घडवून मित्रपक्षांनाच सुरुंग लावला जात आहे. अर्थात, त्यात नवीन काय आहे? भाजपवाल्यांचे राजकारण दशकानुदशके असेच सुरू आहे. तरीही या फोटोफोडीचे हादरे मिंधे गटाला जास्त बसले असावेत.', असं म्हणत भाजप आणि शिंदे गट या दोघांवर टीका करण्यात आली.

Maharashtra Politics: जे पेरलं त्याची फळं त्यांना मिळत आहेत, ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंवर घणाघात
Maharashtra Politics: कार्यकर्त्यांनो, तुम्ही सतरंज्याच उचला! नेत्यांच्या घरात ६-६ जणांना उमेदवारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com