Maharashtra Politics: आधी चंद्रपूर, आता नंदूरबार! भाजप उमेदवाराची जागेवर पलटी, ऐनवेळी अजित पवार गटात उडी

Nandurbar Politics : तळोदा येथे मोठे राजकीय उलथापालथ झालीय. भाजपने तिकीट नाकारल्याने योगेश चौधरी यांनी लगेच आपली पार्टी सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.
Maharashtra Politics Bjp
Yogesh Choudhary joining NCP Ajit Pawar faction after BJP ticket denial and filing nomination for Taloda mayoral post.Saam Tv
Published On
Summary
  • चार मातब्बरांनी पक्ष निरीक्षक यांच्याकडे मुलाखती दिल्या होत्या.

  • चार मातब्बरांनी पक्ष निरीक्षक यांच्याकडे मुलाखती दिल्या होत्या.

  • महायुतीतील भाजप, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी आमने सामने असणार आहे.

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

चंद्रपुरात नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या नेत्यांनी दणादण दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या. त्यामुळे भाजपमधील बंडखोरीमुळे नगराध्यक्ष उमेदवारासमोर आव्हान उभं झालं. त्यानंतर आता नंदुरबारमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झालीय. येथेही तिकीट न मिळाल्यानं बंडखोरी झालीय. भाजपनं तिकीट नाकारताच तात्काळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला. तळोदा नगर पालिकेच्या निवडणुकीत ही खळबळ उडालीय. तळोदा शहरात अर्ज दखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय उलथापालथ झालीय.

तळोदा शहरात अर्ज दखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय उलथापालथ झाली. भारतीय जनता पक्षाने शेवटच्या क्षणी तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या योगेश चौधरी यांनी तत्काळ निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून उमेदवारीचा अर्ज दाखल केला. या अचानक झालेल्या हालचालीने तळोद्याचे राजकीय वातावरण तापले असून सर्वच पक्षांत चर्चा आणि रणनीतीला वेग आला आहे. विशेष म्हणजे या पलिकेसाठी महाआघाडीतर्फे कुणाचीच उमेदवार नाही. महायुतीतील भाजपा, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी आमने सामने असणार आहे.

तळोदा नगर पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून विद्यमान नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, माजी शहराध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी या चार मातब्बरांनी पक्ष निरीक्षक यांच्याकडे मुलाखती दिल्या होत्या. त्यामुळे भाजपा कोणाला उमेदवारी देतो या कडे सगळ्यांचे लक्ष लागून होते.या 4 उमेदवारांचा अहवाल पक्षाकडे पाठविण्यात आल्यानंतर पक्षाने जितेंद्र सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली.

Maharashtra Politics Bjp
ZP, Panchayat Samiti Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा मुहूर्त ठरला, २ दिवसांत घोषणा होणार?

मात्र, इतर तिघांमधून अजय परदेशी आणि डॉ. शशिकांत वाणी यांचे मन वळवण्यास नेतृत्वास यश आले, परंतु तिसरे इच्छुक योगेश चौधरी यांना राजी करण्यास पक्ष नेतृत्व अपयशी ठरले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याशी बोलणी केली होती. मात्र, त्यांनी अधिक जागांची मागणी केल्याने शेवटी ही बोलणी फिस्कटली. त्यानंतर योगेश चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांशी संवाद साधला. त्यांनी होकार दिल्यावर चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नामांकन दाखल करून राष्ट्रवादी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा आखाड्यात उतरली आहे.

Maharashtra Politics Bjp
कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या युतीची खिचडी शिजली; कट्टर विरोधक आले एकत्र, कागलचं राजकारण 24 तासात फिरलं

त्यामुळे तळोदा पालिकेची निवडणूक जिल्ह्यात लक्षवेधी ठरणार आहे. शिवाय या राजकीय खेळीची शहरात खमंग चर्चा होती. योगेश चौधरी यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या या निर्णयाने समर्थकांमध्ये उत्सुकता तर प्रतिस्पर्ध्यांमध्ये नव्या गणितांची धांदल उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com