ZP, Panchayat Samiti Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा मुहूर्त ठरला, २ दिवसांत घोषणा होणार?

Panchayat Samiti elections Maharashtra News : जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लवकर तारीख जाहीर केले जाणार आहे. पुढील दोन दिवसांत याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत.
Panchayat Samiti elections Maharashtra News
Maharashtra ZP–Panchayat Samiti elections likely to enter Phase 2 as poll announcement expected soon.saam tv
Published On
Summary
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यामध्ये होणार आहेत.

  • दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीची घोषणा पुढील दोन दिवसात होणार आहे.

  • पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी पार पडली.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका गेल्या काही वर्षांपासून झाल्याच नव्हत्या. आता या रखडलेल्या निवडणुकीला मुहूर्त लागलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. आधी राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी पार पडलीय.

Panchayat Samiti elections Maharashtra News
ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यातच आता दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरलाय. याबाबतची घोषणा दोन दिवसातच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका डिसेंबर महिन्यातच पार पडणार आहेत. तर तिसऱ्या टप्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. येत्या २० ते २५ दिवसांत या निवडणुका होतील, अशी शक्यता आहे.

Panchayat Samiti elections Maharashtra News
Local Body Election : शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत कलह? राजन साळवींच्या मुलाला उमेदवारी नाकारली

दरम्यान या निवडणुकीची घोषणा लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे. यामुळे पुढच्या महिन्यात होत असलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते २० डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता होती.

त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका २० डिसेंबरनंतर होतील, अशी शक्यता होती. पण आता यात बदल करण्यात आलाय. दोन दिवसात निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com