Local Body Election : शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत कलह? राजन साळवींच्या मुलाला उमेदवारी नाकारली

Mahayuti seat-sharing issues in Konkan explained रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत राजन साळवी यांच्या मुलगा अथर्व साळवी यांना उमेदवारी नाकारल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद, प्रभाग १५ मधील तिकीट वाटप आणि भाजप-शिवसेना मतभेद यामुळे कोकणातील राजकारणात हलचल वाढली आहे.
Rajan Salvi’s son Atharva Salvi
Rajan Salvi’s son Atharva Salviसाम टीव्ही मराठी न्यूज
Published On
Summary
  • रत्नागिरी नगरपरिषदेतील राजन साळवी यांच्या मुलगा अथर्व साळवी यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

  • ही जागा भाजपला दिली जाणार किंवा भाजप आयात उमेदवाराला शिवसेनेतून तिकीट देण्याची चर्चा.

  • या निर्णयामुळे राजन साळवी नाराज असून महायुतीत धुसफूस निर्माण झाली आहे.

  • याच प्रभागातून राजन साळवी यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती

अमोल कलेय, साम टीव्ही प्रतिनिधी

Ratnagiri nagar parishad Election News : उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेलेल्या राजन साळवी यांना रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत राजन साळवी यांच्या मुलाला उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस असल्याचे समोर आल्याची चर्चा आहे.

राजन साळवी अन् उदय सामंत यांच्यातील अंतर्गत कलहाची चर्चा कोकणाच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुलाला उमेदवारी नाकारल्यामुळे राजन साळवी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत मुलाला उमेदवारी नाकारल्यानंतर आता उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात शीतयुद्ध रंगणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Rajan Salvi’s son Atharva Salvi
Local Body Election : अजित पवारांना एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का, गोगावलेंनी रायगडचे राजकारण फिरवले

राजन साळवी यांचा मुलगा अथर्व यांनाा शिवसेनेने रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारली. राजन साळवी यांचा मुलगा अथर्व राजन साळवी प्रभाग क्रमांक १५ मधून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक होते. पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. अथर्वच्या ऐवजी ती जागा भाजपला सोडली जाणार असल्याचे समजतेय. अथवा भाजपमधून आयात उमेदवार करून त्याला शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रत्नागिरीच्या राजकारणात सुरू आहे.

Rajan Salvi’s son Atharva Salvi
Delhi Blast Update : बहि‍णीकडे जातो म्हणून निघाला अन् दिल्लीत पोहचला, बॉम्बस्फोटावेळी मशिदीत मुक्काम, अकोल्यात येताच....

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला रत्नागिरी नगरपरिषदेमधील प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवाराचा ट्विस्ट अद्याप कायम आहे. या जागेसाठी शिवसेनेकडून अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही. राजन साळवी यांचा मुलगा अथर्व या जागेसाठी इच्छुक आहे, पण त्यांना तिकिट नाकारण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, याच प्रभागामधून राजन साळवी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. साळवी हे याच १५ प्रभागातून निवडून आले अन् रत्नागिरीचे नगराध्यक्ष झाले होते.

Rajan Salvi’s son Atharva Salvi
Mumbai Crime : मध्यरात्री मुंबई हादरली! २७ वर्षाच्या फ्रेंच तरूणीसोबत नको ते केले, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com