Local Body Election : अजित पवारांना एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का, गोगावलेंनी रायगडचे राजकारण फिरवले

Bharat Gogawale Vs Aditi Tatkare Raigad Politics News :रायगडमधील रोहा आणि महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तटकरे यांचे विश्वासू शिल्पा धोत्रे आणि लालताप्रसाद कुशवाह यांनी शेकडो समर्थकांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.
Bharat Gogawale Vs Aditi Tatkare Raigad Politics News
Raigad Politics News Bharat Gogawale Aditi Tatkare Saam TV Marathi news
Published On
  • शिल्पा धोत्रे आणि लालताप्रसाद कुशवाह यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला.

  • भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शेकडो समर्थकांसह शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश केला.

  • शिल्पा धोत्रे यांना रोहा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

  • महाडमध्ये पाच पक्षांविरोधातही शिवसेना नगराध्यक्ष मिळवेल असा दावा विकास गोगावलेंनी व्यक्त केला.

Ajit Pawar setback in Raigad municipal politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत रायगडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. तटकरेंचा विश्वासू शिलेदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. भरत गोगावले यांनी तटकरेंच्या होमपिचवर म्हणजेच रोह्यात राजकारण फिरवले आहे. नगराध्यक्षापदाच्या दावेदार असलेल्या शिल्पा धोत्रे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत पडझड झाली आहे. माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे आणि माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे होमपीच असलेल्या रोह्यात मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. रोहा शहराच्या माजी उपनगराध्यक्षा आणि नगराध्यक्ष पदाच्या दावेदार शिल्पा धोत्रे यांच्यासह माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिल्पा धोत्रे यांना रोहा नगर परिषदेसाठी शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिल्पा धोत्रे या सुनील तटकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला रोह्यात मोठा धक्का बसल्याचे मानलं जात आहे.

Bharat Gogawale Vs Aditi Tatkare Raigad Politics News
Local Body Election : उद्धव ठाकरेंना भाजपचा पुन्हा जबरी धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ

महाडमध्ये पाच पक्ष विरुध्द एकटे भरतशेठ; महाडचा नगराधक्ष शिवसेनेचा होणार

महाडमध्ये पाच पक्ष विरुद्ध एकटे भरतशेठ अशी लढत होत असताना महाडचा नगराध्यक्ष शिवसेनेचा होणार असल्याचा विश्वास शिवसेना कोअर कमिटी मेंबर विकास गोगावले यांनी व्यक्त केला आहे. युतीचा धर्म आम्ही पाळला नाही असे कोणी बोलायला नको असे सांगताना भाजपला काय मिळतय, हे पाहयला पाहिजे असा प्रश्न देखील विकस गोगावले यांनी केला आहे. महाड नगर पालिकेला साडेचारशे कोटी रूपयांचा निधी भरत गोगावले यांनी दिल्याची आठवण विकास गोगावले यांनी करून दिली आहे.

Bharat Gogawale Vs Aditi Tatkare Raigad Politics News
ठाण्यात मोठी उलथापालथ! कट्टर समर्थकाने ऐनवेळी राष्ट्रवादी सोडली, आता आव्हाडांच्या पत्नी मैदानात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com