कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या युतीची खिचडी शिजली; कट्टर विरोधक आले एकत्र, कागलचं राजकारण 24 तासात फिरलं

Kolhapur Politics: कोल्हापूरच्या राजकारणात मोठी उलाधापालथ झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि त्यांचे प्रतिस्पर्धी समरजितसिंह घाटगे यांनी युती केलीय. अवघ्या २४ तासांतच झालेल्या या युतीमुळे कागलचे राजकीय चित्र बदललंय.
Kolhapur Politics:
Unexpected alliance in Kolhapur as Hasan Mushrif and Samarjitsinh Ghatge unite for NCP.saam tv
Published On
Summary

कट्टर विरोधक हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एकत्र

या युतीमुळे कागलची राजकीय समीकरणे २४ तासांत बदलली आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्र येण्यामुळे आगामी निवडणुकांत समीकरणे बदलणार.

कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात राजकीय डावपेचामुळे खळबळ उडालीय. कोल्हापुरात भाजपनं स्वतंत्र चुल मांडल्यानंतर अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी डाक टाकत थेट विरोधकासोबत हातमिळवणी केलीय. हो,अगदीबरोबर कोल्हापुरात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह सिंह घाटगे यांनी युती केली. पण घाटगे यांच्या या निर्णयामुळे अनेक समर्थकांना प्रश्न पडले. त्यांनी मुश्रीफसोबत युती कशी केली? असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचं उत्तर स्वत: घाटगे यांनी दिलंय.

दरम्यान मुश्रीफांच्या डावामुळे राज्यात आणखी एका नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. कोल्हापुरात भुतो ना भविष्यती असी युती झालीय. ही युती कशी झाली कोणी-कोणासोबत केली? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊ. तेही थेट घाटगे यांच्या पत्रकातून.

युती का झाली?

भाजपनं कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिका, नगरपंचायतमध्ये भाजपने स्वतंत्र निवडणुकीचा नारा दिला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात अर्थात कागल तालुक्यात विरोधक आव्हान देत होते. मुश्रीफ यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी, समरजित घाटगे आणि शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी कागल आणि मुरगूड नगरपरिषद निवडणुकीसाठी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली होती. या आघाडीवर शिक्कामोर्तब होणार तोच हसन मुश्रीफांनी राजकीय डाव खेळत राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या समरजितसिंह घाटगेंना युतीची टाळी देण्यास मनवून घेतलं.

आज दोन्ही नेत्यांनी युती करत असल्याची घोषणा केली. मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद समरजित घाटगे गटाला देण्यात येईल. मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांची एकत्रित आघाडी होताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. कागलच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गैबी चौकात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला.

युतीबाबत काय म्हणाले घाटगे

श्री छत्रपती शाहू आघाडीमधील सर्व कार्यकर्त्यांना नमस्कार,आपणा सर्वांना ज्ञात आहेच की कागल व मुरगूड नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आपल्या शाहू आघाडीमार्फत ही निवडणूक ताकतीने लढविण्यासाठी आपण सर्वांनी जय्यत तयारी केली आहे.मात्र गेल्या दोन दिवसात अनपेक्षितपणे घडामोडी झाल्या, वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी केलेल्या भावनिक आवाहनानुसार यामध्ये आपल्याला पारंपरिक विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजीत पवार गटाशी युती करावी लागली.

Kolhapur Politics:
ZP, Panchayat Samiti Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा मुहूर्त ठरला, २ दिवसांत घोषणा होणार?

खरं म्हणजे याबाबतीत आपल्या गटाच्या परंपरेप्रमाणे आपल्या सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र अतिशय कमी वेळात याबाबतीत निर्णय घेऊन तडजोड करणे आवश्यक होते. कागल,मुरगूड शहर व तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने व आपल्या शाहू आघाडीतील सर्व कार्यकर्ते यांना बळ देण्याच्या दृष्टीने असा निर्णय घ्यावा लागला.

Kolhapur Politics:
Nashik Politics: भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये धक्का,बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

अर्थात आपल्या गटाच्यादृष्टीने निवडणुकीत युती किंवा तडजोडी बाबतचा असा निर्णय घेण्याची ही काही पहिली वेळ आहे असे नाही. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान स्वर्गीय राजेसाहेब यांनी सुद्धा कागलच्या शाश्वत विकासाच्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून असे निर्णय घेतले होते व त्यास आपण सर्वांनी विश्वासाने साथ दिली होती, हा इतिहास आहे. याचीच पुनरावृत्ती या निमित्ताने झालेली आहे.

याबाबतीत आपणा शाहू आघाडीतील सर्वांशी व युती झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांशी संयुक्तपणे संवाद साधण्यासाठी उद्या मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी मटकरी हॉल कागल येथे सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद होत आहे. यावेळी मा. मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्यासोबत संयुक्तपणे आम्ही याबाबतची भूमिका मांडू.

स्वर्गीय राजे साहेब यांच्या संकल्पनेतील कागलच्या शाश्वत विकासासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांच्याच आदर्शांप्रमाणे या निमित्ताने तडजोड केली आहे.कागल व मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीत शाहू आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या आघाडीचे नगराध्यक्ष व सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करूया असे आवाहन या निमित्ताने करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com