Eknath SHinde- Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदे गटाचे खासदार 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढणार? ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

Shivsena MLA Disqualification Result: 10 जानेवारी हा काळा दिवस मानला गेला पाहिजे. मराठी माणसाला संपवून सुरतेची गुलामी करायला लावायची असा हा निर्णय असून महाराष्ट्राचे अस्तित्व संपवणारा निकाल असल्याचे विनायक राऊत म्हणाले.

अमोल कलये

Maharashtra Political News:

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिंदे गट हाच मुळ शिवसेना असल्याचा निकाल दिला. या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून राहुल नार्वेकरांविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच राहुल नार्वेकरांच्या निकालाबाबत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.

काय म्हणाले विनायक राऊत?

शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आमदार अपात्रतेच्या निर्णयावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. "10 जानेवारी हा काळा दिवस मानला गेला पाहिजे. मराठी माणसाला संपवून सुरतेची गुलामी करायला लावायची असा हा निर्णय असून महाराष्ट्राचे अस्तित्व संपवणारा निकाल," असल्याचे विनायक राऊत म्हणाले.

नार्वेकरांवर टीका...

तसेच "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं हिंगोली येथील भाषण संपलं आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी आपला निर्णय दिला, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधानांचा वापर महाराष्ट्रामध्ये फलदायी होणार नाही, भाजप गद्दार गटाला फेकून देणार.." असेही ते यावेळी म्हणाले.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिंदे गट कमळ चिन्हावर लढणार?

यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी आगामी लोकसभा निवडणुकांवरुन (Loksabha Election 2024) सर्वात मोठा गौप्यस्फोट केला. "मिंदे गटाच्या खासदारांना कमळ चिन्हवर लढा असे सांगितले गेले आहे, असा मोठा दावा राऊतांनी यावेळी केला. तसेच शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर आपल्या पक्षाचा निर्णय काय असेल हे अजित पवार यांना आता कळलं आहे.." असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homeguard Recruitment : होमगार्डसाठी वयोमर्यादा किती आहे? जाणून घ्या महत्वाचे नियम अन् शेवटची तारीख

Maharashtra Nagar Parishad Live : शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडलं

सिन्नरमध्ये मतदानावेळी वाद; अजित पवारांच्या उमेदवाराच्या समर्थकावर स्प्रे हल्ला, २ गटात तुफान हाणामारी|VIDEO

Alibaug Travel : अलिबागमध्ये लपलेले सुंदर रत्न, निसर्ग सौंदर्याने सजलाय 'हा' समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मी आणि समरजीतसिंह घाडगे एकत्र आलो - मंत्री हसन मुश्रीफ

SCROLL FOR NEXT